चोपडा – गेल्याआठ दिवसाच्या संघर्षानंतर शंकरराव नाटू सोनवणे (माजी सरपंच हातेड़ बु ८६) हे कोरोना सारख्या जीवघेण्या आजारावर यशस्वी मात करून चोपडा उपजिल्हा रुग्णालयातुन घरी जात असताना चोपडा उपजिल्हा रुग्णालयातील डॉक्टर व स्टाफ बद्दल गौरवोद्गार काढून त्यांना आनंद अश्रू आवरता आले नाही म्हणून गेल्या आठ दिवसात उपजिल्हा रुग्णालयाचे अधीक्षक डॉ मनोज पाटील,डॉ गुरुप्रसाद वाघ,डॉ सुरेश पाटील,डॉ राहुल विश्वनाथ पाटील यांनी वेळोवेळी योग्य उपचार करून माझे एकट्याचे नाही तर ते अनेकांचे प्राण वाचवत आहेत अश्या शब्दात आपल्या भावना व्यक्त करत शंकरराव नाटू सोनवणे यांनी घरी जाण्यापूर्वी डॉक्टरांचे शाल श्रीफळ टाकून त्याचा सत्कार केला आहे. यावेळी त्याच्या डोळ्यात अश्रू तराळले होते.
खाजगी रुग्णालया पेक्षा तसूभरही कमी नाही अशी सेवा चोपडा उपजिल्हा रुग्णालयाच्या वतीने देण्यात येत आहे. खाजगी रुग्णालयांमध्ये डॉक्टर पी. पी. ई किट घालून तर काही डॉक्टर लांबूनच कंपाउंडर च्या माध्यमातून सेवा देण्याचे काम करीत आहेत. आणि चोपडा उपजिल्हा रुग्णालयाची शंभर खाटांची क्षमता असताना त्या ठिकाणी जवळपास दुप्पट रूग्ण उपचार घेत आहेत. त्यांचा उपचार करत असताना कुठलेही पी पी ई किट डॉक्टर मनोज पाटील व डॉक्टर गुरुप्रसाद वाघ डॉ सुरेश पाटिल घालत नाहीत. रुग्णांच्या डोक्यावर हात ठेवतात , पाठीवर हात ठेवून त्यांचं मनोबल वाढवतात, त्यांच्याशी हितगुज साधतात, त्यांची मानसिकता सुधारतात अशा डॉक्टरांचे . जे आपला एक एक क्षण लोकांचे प्राण वाचविण्यासाठी देत असतील अशा गोरगरिबांचे जीव वाचवणारे डॉक्टरांचे मनापासून कौतुक झाले पाहिजे रुग्णांचा सांभाळ करीत असतांना अभिनंदनच केले पाहिजे.
कोरोना सारख्या महाभयंकर आजाराला जग घाबरले आहे आणि काही लोक राजकारण करत आहेत हे योग्य नाही,चोपड्याची तशी संस्कृती नाही,शासकीय रुग्णालय असले तरी असे उपचार खासगीत मिळत नाही अश्या भावना माजी सरपंच शकरराव सोनवणे ,संभाजी शंकरराव सोनवणे,गणेश शंकरराव सोनवणे, प्रवीण शंकरराव सोनवणे ,धनंजय शिवाजीराव सोनवणे यांनी यावेळी बोलून दाखवल्या होत्या. राज्याचे सुकाणू समितीचे सदस्य एस बी पाटील,कुलदीप पाटील हजर होते.