जळगाव – विश्वभूषण डॉ बाबासाहेब आंबेडकरांची 130 वी जयंतीनिमित्त जळगाव शहरातील रेडक्रॉस सोसायटी समोरील डॉ बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन करण्याचा कार्यक्रम बौद्ध समाज च्या वतीने शासन नियमाप्रमाणे कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.
सदर कार्यक्रमला जिल्हा पोलीस अधीक्षक प्रविण मुंडे व सहाय्यक पोलीस अधीक्षक कुमार चिंथा यांची प्रमुख उपस्थिती होती. मान्यवरांचे स्वागत समता सैनिक दलाचे जिल्हाध्यक्ष विजय निकम व नगरसेवक सुरेश सोनवणे यांनी पुष्पगुच्छ देऊन केले. जिल्हा पोलीस अधीक्षक प्रविण मुंडे यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून व अगरबत्ती मेणबत्ती लावून डॉ बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन करण्यात आले.
तसेच सहाय्यक पोलीस अधीक्षक कुमार चिंथा यांनी देखील डॉ बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन केले. या स्थळा ला आंबेडकरी चळवळीतील कार्यकर्ते यांना घडविण्याचे ठिकाण आहे. समता सैनिक दलाचे अध्यक्ष विजय निकम , नगरसेवक सुरेश सोनावणे, जिल्हापेठ पोलीस निरीक्षक पवार साहेब , आदींची प्रमुख उपस्थिती होती. यशस्वी साठी राजू सपकाळे, भिका भालेराव, अनिल सोनावणे, सुखदेव सपकाळे, शिवाजी सोनवणे, शांताराम सोनवणे, राजू भालेराव ,ज्ञानेश्वर महाले , आनंद सोनवणे आदी उपस्थित होते. कार्यक्रम ठिकाणी सैनिटाईजर व मास्क ची व्यवस्था करण्यात आली होती.