जळगाव – जळगाव येथील शासकीय तंत्रनिकेतन मध्ये सुरू असलेल्या लोकसंघर्ष मोर्चा कोविड केअर सेंटर मध्ये आज महामानव भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची 130 वी जयंती सोशल डिस्टंसिंग चे सर्व नियम काटेकोर पाळून साजरी करण्यात आली.
यावेळी महात्मा ज्योतिबा फुले आणि सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले आणि जयघोष करण्यात आला. लोकसंघर्ष मोर्चाच्या राष्ट्रीय अध्यक्ष आणि ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या प्रतिभाताई पाटील यांच्यासमवेत लोकसंघर्ष मोर्चाचे सचिव सचिन भाऊ धांडे, भरत कर्डिले, प्रमोद पाटील, छोटू भाऊ, किरण, कलींदर तडवी, सेंटरमधील रुग्णसेवेतील डॉक्टर, परिचारिका, वॉर्ड बाय, लोकसंघर्ष मोर्चा चे सर्व सेवा समर्पित कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते.
लोकसंघर्ष मोर्चा ही महाराष्ट्रातील वंचित पीडित आदिवासी आणि अन्याय ग्रस्तांसाठी मागील साडेतीन दशकांपासून काम करत असलेली व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या समतावादी विचारांचा वारसा असलेली एक अग्रगण्य संघटना आहे.
कोविड काळामध्ये कोणीही रुग्ण पैशांमुळे आरोग्य सेवेपासून वंचित राहू नये यासाठी लोकसंघर्ष मोर्चा ने शासकीय तंत्रनिकेतन मध्ये 17 मार्च पासून निशुल्क कोविड केअर सेंटर सुरू केले आहे या सेंटरमध्ये आज पर्यंत 500 हून अधिक रुग्ण दाखल झाले असून 300 पेक्षा जास्त रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत.
कोरूना ने ग्रस्त असलेल्या गरजू रुग्णांना या ठिकाणी निवास व्यवस्थेसह पोषक आहार दोन वेळचे जेवण दूध अंडी आणि आरोग्य सेवा व औषधोपचार पुरवला जातो. समाजातील संवेदनशील व दातृत्ववान लोकांच्या सहभागातून हे सेंटर सुरू असून सर्व स्तरातील रुग्ण याठिकाणी उपचार घेतात त्यामुळे समाजातील नागरिकांचा आधार म्हणून लोकसंघर्ष मोर्चा को बीड केअर सेंटर कडे पाहिले जाते. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीच्या निमित्ताने आणखी उत्साहाने जोमाने रुग्णसेवा करण्याचा संकल्प येथील सर्व डॉक्टर्स परिचारिका वॉर्डबॉय आणि लोकसंघर्ष मोर्चाच्या कार्यकर्त्यांनी केला. लोकसंघर्ष मोर्चाच्या राष्ट्रीय अध्यक्ष प्रतिभाताई शिंदे यांनी सर्वांना प्रोत्साहित केले