Sunday, March 15, 2026
Divya Jalgaon
Advertisement
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय
No Result
View All Result
Divya Jalgaon
No Result
View All Result

पालकमंत्र्यांचे पंढरपुरात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन

by Divya Jalgaon Team
April 14, 2021
in जळगाव, राज्य, संपादकीय, सामाजिक
0
पालकमंत्र्यांचे पंढरपुरात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन

जळगाव – राज्याचे पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री तथा जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांनी आज पंढरपूर येथे भारतीय राज्य घटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला अभिवादन केले. ते प्रचारासाठी पंढरपुरात आले आहेत. याप्रसंगी माल्यार्पण केल्यानंतर त्यांनी शासकीय नियमांचे पालन करून डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती साजरी करण्याचे आवाहन केले.

पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा मतदारसंघाचे आमदार भारत भालके यांच्या निधनामुळे रिक्त झालेल्या जागेसाठी निवडणूक होत आहे. यात महाविकास आघाडीतर्फे भगिरथ भालके यांना उमेदवारी देण्यात आलेली आहे. त्यांच्या प्रचारासाठी खान्देशची मुलुखमैदान तोफ ना. गुलाबराव पाटील यांच्या आज दोन सभा होत आहेत. यातील एक सभा ही सकाळी भोसे ता. मंगळवेढा येथे तर दुसरी दुपारी तीन वाजता शीवतीर्थ पंढरपूर येथे होणार आहे.

दरम्यान, आज सकाळी ना. गुलाबराव पाटील यांनी पंढरपूर येथील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला माल्यार्पण करून अभिवादन केले. याप्रसंगी त्यांच्यासोबत शिवसेनेचे स्थानिक जिल्हाप्रमुख संभाजी शिंदे यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

याप्रसंगी ना. गुलाबराव पाटील म्हणाले की, संविधानाचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्यामुळे आज आपण सर्व जण खर्‍या अर्थाने लोकशाहीवादी प्रणालीचे लाभ घेत आहोत. बहुजनांना त्यांचे हक्क मिळवून देण्यात मोलाची भूमिका बजावणार्‍या बाबासाहेबांचे विचार अंमलात आणणे हेच त्यांना खरे अभिवादन ठरणार आहे. सध्या कोविडची आपत्ती सुरू असून राज्य सरकारने विविध नियम आखून दिले आहेत. या नियमांचे पालन करून आपण सर्वांनी साधेपणाने जयंती उत्सव साजरा करावा असे आवाहन ना. गुलाबराव पाटील यांनी याप्रसंगी केले.

Share post
Tags: Divya JalgaonGulabrao PatilMarathi NewsPandharpurडॉ. बाबासाहेब आंबेडकरपालकमंत्र्यांचे पंढरपुरात
Previous Post

शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात भारतरत्न डॉ. आंबेडकर यांची जयंती साजरी

Next Post

लोकसंघर्ष मोर्चा निशुल्क कोविड केअर सेंटर मध्ये भीमजयंती साजरी

Next Post
लोकसंघर्ष मोर्चा निशुल्क कोविड केअर सेंटर मध्ये भीमजयंती साजरी

लोकसंघर्ष मोर्चा निशुल्क कोविड केअर सेंटर मध्ये भीमजयंती साजरी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

© 2020 Website managed by Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय

© 2020 Website managed by Tech Drift Solutions.

Don`t copy text!
Join WhatsApp Group