जळगाव प्रतिनिधी । जिल्ह्यात आज दिवसभरात ९८४ रुग्ण कोरोनाबाधीत आढळून आले असून यात जिल्ह्यात आज दिवसभरामधून २१ जणांचा मृत्यू झाले आहे. यात ११९५ रूग्ण बरे होऊन घरी परतले.
जिल्ह्यात पहिल्यांदा हजाराच्या आत रूग्ण आढळून आले आहे. तर बरे होणाऱ्या रूग्णांची संख्या अधिक दिसून येत आहे. यात ९८४ रूग्ण पॉझिटीव्ह आढळून असून १ हजार १९५ रूग्ण बरे होवून घरी परतले आहे. तर जिल्ह्यात आज दिवसभरात २१ जणांचा मृत्यू झाला आहे. जळगाव शहरातील कायम असून मुक्ताईनगर तालुक्यात संसर्ग वाढला आहे.
जळगाव शहर-२११, जळगाव ग्रामीण -७५, भुसावळ-७८, अमळनेर-३७, चोपडा-१२, पाचोरा-१७, भडगाव-३४, धरणगाव-४६, यावल-६७, एरंडोल-७३, जामनेर-२०, रावेर-८६, पारोळा-६, चाळीसगाव-५९, मुक्ताईनगर-१५८, बोदवड-० आणि इतर -५ एकुण ९८४ बाधित आढळूले आहे.
जिल्हा रूग्णालयाने आज पाठविलेल्या अहवालात एकुण १ लाख ५ हजार ३६ रूग्ण संख्या झाली आहे. त्यापैकी ९१ हजार ६९९ रूग्ण बरे होवून घरी परतले आहे. तर ११ हजार ५८९ रूग्ण विविध कोवीड रूग्णालयात उपचार घेत आहे. आज जिल्ह्यात पहिल्यांदा २१ रूग्णांचा मृत्यू झाल्याचा उच्चांक गाठला आहे. अशी माहिती जिल्हा शल्यचिकित्सक अधिकारी डॉ.एन.एस.चव्हाण यांनी दिलेल्या प्रसिध्दीपत्रकातून कळविले आहे.