Sunday, December 7, 2025
Divya Jalgaon
Advertisement
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय
No Result
View All Result
Divya Jalgaon
No Result
View All Result

डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव साध्या पध्दतीने साजरा करण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे आवाहन

by Divya Jalgaon Team
April 9, 2021
in जळगाव, प्रशासन, सामाजिक
0
नव्याने दाखल होणाऱ्या बंद्यांसाठी शासकीय तंत्रनिकेतन विद्यालयात तात्पुरते कारागृह

जळगाव – कोविड-19 मुळे उध्दभवलेल्या संसर्गजन्य परिस्थितीचा विचार करता यावर्षी 14 एप्रिल, 2021 रोजीचा डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव साध्या पध्दतीने साजरा करण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला असुन त्यानुषंगाने खालीलप्रमाणे मार्गदर्शक सूचना निर्गमित केल्या आहेत.

दरवर्षी 14 एप्रिल या दिवशी परमपुज्य भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकरांचे अनेक अनुयायी मोठया संख्येने जमुन तसेच जयंती दिनाच्या आदल्या दिवशी मध्यरात्री 12 वाजता देखील एकत्र येऊन परमपुज्य भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती राज्यात ठिकठिकाणी साजरी करतात, परंतु यावर्षी कोविड-19 चा वाढता प्रादुर्भाव टाळण्यासाठी अत्यंत साधेपणाने सकाळी 7.00 वाजेपासुन संध्याकाळी 8.00 वाजण्यापुर्वी परमपुज्य भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती साजरी करणे अपेक्षित आहे.

यावर्षी कोविड-19 विषाणुचा वाढता प्रादुर्भाव विचारात घेता दर वर्षीप्रमाणे प्रभात फेरी, बाईक रॅली, मिरवणुका यावेळी जयंती निमीत्ताने काढणत येऊ नयेत. त्याऐवजी परमपुज्य भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला अथवा प्रतिमेला पुष्पहार अर्पण करतांना त्याठिकाणी अनुयायांची संख्या एकावेळी 5 पेक्षा जास्त नसावी. तसेच तेथे सोशल डिस्टंन्सींगचे व स्वच्छतेच्या सर्व नियमांचे काटेकोरपणे (मास्क, सॅनिटायझर इत्यादी) पालन करुन परमपुज्य भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती साजरी करण्यात यावी.

तथापि, चैत्यभुमी, दादर,मुंबई येथे परमपुज्य भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकरांना शासकीय मानवंदना देणेसाठी मा. राज्यपाल, मा.मुख्यमंत्री व इतर मान्यवर उपस्थित राहणार असल्याने सदर कार्यक्रमांसाठी 50 पर्यत व्यक्तीं उपस्थित राहु शकतील. तसेच दिक्षाभुमी नागपुर येथील कार्यक्रमासाठी 50 पर्यत व्यक्ती उपस्थित राहु शकतील.

कोविड-19 विषाणुच्या पार्श्वभुमीवर चैत्यभुमी, दादर, मुंबई येथे गर्दी करण्यास निर्बंध असल्याने व दादर, मुंबई तसेच महाराष्ट्रातील अन्य रेल्वे स्थानकावरही गर्दी करण्यास निर्बंध असल्याने शासनातर्फ जयंतीनिमित्त चैत्यभुमी, दादर, मुंबई येथील कार्यक्रमाचे दुरदर्शनवरुन थेट प्रेक्षपण करण्यात येणार असल्याने सर्व अनुयायींनी चैत्यभुी, दादर, मुंबई येथे न येता घरातुन परमपुज्य भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करावे. दरवर्षी परमपुज्य भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती साजरी करताना संपुर्ण महाराष्ट्रात विविध कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. परंतु यावर्षी कोविड-19 विषाणुचा वाढता प्रादुर्भाव पहाता सार्वजनिक ठिकाणी गाणी, व्याख्याने, पथनाटय इत्यादीचे सादरीकरण अथवा इतर कोणत्याही सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन जयंती निमित्ताने करण्यात येऊ नये. त्याऐवजी सदर कार्यक्रमाचे केबल नेटवर्कव्दारे अथवा ऑनलाईन प्रक्षेपण उपलब्ध करुन देण्याबाबत व्यवस्था करण्यात यावी.

परमपुज्य भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती दिनी आरोग्यविषयक उपक्रम/शिबीरे (उदा.रक्तदान) स्थानिक प्रशासनाच्या पुर्वानुमतीने आयोजित करता येतील आणि त्याव्दारे कोरोना, मलेरिया, डेंग्यु इत्यादी आजार आणि त्यांचे प्रतिबंधात्मक उपाय तसेच स्वच्छता याबाबत जनजागृती करता येईल. तथापि आरोग्यविषयक उपक्रमांचे आयोजन करताना त्या ठिकाणी सोशल डिस्टंन्सींग तसेच स्वच्छतेचे नियम (मास्क्,सॅनिटायझर इत्यादी) पाळण्याकडे विशेष लक्ष देण्यात यावे.

राज्यातील कोविड-19 विषाणुचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी शासनाच्या मदत व पुनर्वसन, आरोग्य, पर्यावरण, वैद्यकीय शिक्षण विभाग तसेच संबंधित महानगरपालिका, पोलीस प्रशासन, स्थानिक प्रशासन यांनी विहित केलेल्या नियमांचे काटेकोर पालन करावे. तसेच या परिपत्रकानंतर व प्रत्यक्ष जयंती दिनाचा कार्यक्रम सुरु होण्याच्या मधल्या कालावधीत शासनस्तरावरुन आणखी काही मार्गदर्शक सुचना प्रसिध्द झाल्यास त्यांचे देखील अनुपालन करावे. असे आवाहन अभिजीत राऊत, जिल्हाधिकारी तथा अध्यक्ष, आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण, जळगांव यांनी केले आहे.

Share post
Tags: #Dr. Babasaheb AmbedkarJalgaonJayantiMarathi Newsडॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव साध्या पध्दतीने साजरा करण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे आवाहन
Previous Post

देवेंद्र फडणवीस, गिरीश महाजन यांच्या राजीनाम्या च्या मागणीसाठी सोशल मीडियावर जोरदार ट्रेंड

Next Post

जिल्ह्यात आज ११६७ रूग्ण कोरोनाबाधित आढळले

Next Post
जिल्ह्यात आज १०६३ रूग्ण कोरोनाबाधित आढळले, २१ जणांचा मृत्यू

जिल्ह्यात आज ११६७ रूग्ण कोरोनाबाधित आढळले

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

© 2020 Website managed by Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय

© 2020 Website managed by Tech Drift Solutions.

Don`t copy text!
Join WhatsApp Group