जळगाव – माजी मुंबई पोलिस आयुक्त परमबीरसिंग यांनी केलेल्या 100 कोटी वसुलीच्या आरोपांवर अनिल देशमुख यांनी नैतिकतेच्या आधारावर जसा गृहमंत्री पदाचा राजीनामा दिला त्याचप्रमाणे सामजिक कार्यकर्ते ॲड.विजय भास्करराव पाटील यांनी केलेल्या जामनेर शहरातील जिल्हा परिषदेच्या जागेवर बांधण्यात आलेल्या शॉपिंग कॉमप्लेक्सच्या कामात 200 कोटींच्या घोटाळ्याच्या आरोपावर तत्कालीन मुख्यमंत्री व सध्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस व माजी जलसंपदामंत्री गिरीष महाजन यांनी त्याच नैतिकतेच्या आधारावर विरोधी पक्षनेते पदाचा व आमदारकीचा राजीनामा द्यावा अशी मागणी जळगाव जिल्ह्याच्या विविध कानाकोपर्यातून केली जात आहे.
याबाबत सामाजिक कार्यकर्ते पियुष नरेंद्रअण्णा पाटील यांच्यासह युवा सेना ,राष्ट्रवादी,काँग्रेस च्या पदाधिकाऱ्यांनी सोशल मीडियावर राजीनाम्याची मागणी करत ट्विटरवरुन थेट फडणवीस व गिरीश महाजन यांना TAG करत राजीनाम्याची मागणी केलेली आहे.यासोबतच सोशल मीडियावर राजीनामा घेतला जावा की नाही याबाबत पोल दिला आहे याला संपूर्ण जिल्ह्यातून राजीनामा घेतलाच पाहिजे म्हणून जोरदार प्रतिसाद मिळत आहे व लोक मोठ्या प्रमाणावर तीव्र भावना व्यक्त करत आहे.
एवढेच नव्हे तर पियुष नरेंद्रअण्णा पाटील यांनी यासाठी राष्ट्रवादीचे अध्यक्ष मा. शरदचंद्रजी पवार , मा.उद्धवजी ठाकरे मुख्यमंत्री, महाराष्ट्र राज्य.,खासदार सौ.सुप्रिया सुळे,शिवसेनेचे खा.मा.संजय राऊत,खा.अमोल कोल्हे ,आमदार अमोल मिटकरी,आ.रोहित पवार इ. ना देखील ट्विट केले केले आहे.
आता यानंतर देवेंद्र फडणवीस ,गिरीश महाजन यांच्यावर झालेल्या 200 कोटीच्या अपहरणाच्या आरोपानंतर नैतिकतेच्या आधारावर राजीनामा देतील का हे बघणं महत्त्वाचे ठरणार आहे.