अबु धाबी – आयपीएलच्या 13 व्या सत्रातील 48वा सामना मुंबई इंडियंस (MI) आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू (RCB)दरम्यान अबुधाबीमध्ये झाला. या सामन्यात मुंबईने बंगळुरुवर 5 गडी राखून विजय मिळवला आहे. मुंबईने टॉस जिंकून गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. बंगळुरुने मुंबईला 165 धावांचे लक्ष्य दिले होते. सूर्यकुमार यादवच्या सर्वाधिक 79 रनांच्या जोरावर मुंबईने 19.1 ओव्हरमध्ये लक्ष्य गाठले.MI vs RCB : मुंबईकडून बंगळुरुचा 5 गडी राखून पराभव.
मुंबईने पावर-प्लेमध्ये 45 रन काढले
मुंबईचा ओपनर क्विंटन डिकॉक आणि ईशान किशनने संघाला सुरुवातीला 37 रन काढून दिले. यानंतर डिकॉक 18 रनावर मोहम्मद सिराजच्या बॉलवर आउट झाला. यानंतर सूर्यकुमार यादव आणि किशन पावर-प्लेमध्ये 45 रनपर्यंग गेले. किशन 25 रन काढून युजवेंद्र चहलच्या बॉलवर आउट झाला.MI vs RCB : मुंबईकडून बंगळुरुचा 5 गडी राखून पराभव .
बंगळुरुची 71 रनांची ओपनिंग पार्टनरशिप
देवदत्त पडिक्कल आणि जोश फिलिपने बंगळुरुला चांगली सुरुवात करुन दिली. दोघांनी पॉवर प्लेमधील 50 रनांसह 71 रनांची ओपनिंग पार्टनरशिप केली. यानंतर राहुल चाहरने फिलिप (33) ला आउट केले.
बुमराहच्या नावे नवा विक्रम
बुमराहने या सामन्यात विराट कोहलीची विकेट घेतल्यानंतर आयीपीएलमध्ये 100 विकेट पूर्ण केल्या आहेत.
बंगळुरूमध्ये तीन बदल
बंगळुरू संघात तीन बदल करण्यात आले आहेत. जखमी नवदीप सैनीऐवजी शिवम दुबे, ओपनर एरॉन फिंचऐवजी जोश फिलिप आणि मोइन अलीच्या जागी डेल स्टेनला संधी मिळाली आहे. तर, मुंबईत कोणतेच बदल करण्यात आले नाहीत.
दोन्ही संघ
बंगळुरू: देवदत्त पडिक्कल, जोश फिलिप (विकेटकीपर), विराट कोहली (कप्तान), एबी डिविलियर्स, गुरकीरत सिंह मान, शिवम दुबे, क्रिस मॉरिस, वॉशिंगटन सुंदर, डेल स्टेन, मोहम्मद सिराज आणि युजवेंद्र चहल.
मुंबई: ईशान किशन, क्विंटन डिकॉक (विकेटकीपर), सूर्यकुमार यादव, सौरभ तिवारी, हार्दिक पंड्या, कीरोन पोलार्ड (कर्णधार), क्रुणाल पंड्या, जेम्स पैटिंसन, राहुल चाहर, ट्रेंट बोल्ट आणि जसप्रीत बुमराह.
अजून वाचा
IPL 2020 : गेल ठरला पंजाबसाठी लकी