Saturday, December 6, 2025
Divya Jalgaon
Advertisement
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय
No Result
View All Result
Divya Jalgaon
No Result
View All Result

जगदीश चौधरींची सैन्यदलातील दुसर्‍या सर्वोच्च पदावर नियुक्ती

मूळचे आसोदा येथील रहिवासी जगदीश चौधरी

by Divya Jalgaon Team
October 29, 2020
in जळगाव
0
asoda news

जळगाव प्रतिनिधी । मूळचे आसोदा येथील रहिवासी असणारे जगदीश चौधरी यांची भारतीय सैन्यदलतील दुसर्‍या क्रमांकाचे सर्वोच्च पद असणार्‍या लेप्टनंट जनरल या पदावर नियुक्ती करण्यात आली आहे.

सध्या मेजर जनरल या पदावर असणार्‍या जगदीश बळीराम चौधरी यांना सैन्यदलातील दुसर्‍या क्रमांकाचे सर्वोच्च पद असलेल्या लेप्टनंट जनरल या पदावर पदोन्नती मिळाली आहे. जगदीश चौधरी यांचे प्राथमिक शिक्षण आसोद्यात झाले असून त्यांनी पुढील शिक्षण सातारा सैन्य स्कूल व एनडीएमध्ये त्यांनी पुढील शिक्षण घेतले आहे. सन १९८७पासून ते सैन्यदलात कार्यरत आहेत. यात त्यांनी कॅप्टन, लेफ्टनंट कर्नल, कर्नल, ब्रिगेडीयर या महत्त्वाच्या पदांवर यशस्वीरित्या कार्य केले आहे. उच्च न्यायालयाचे सेवानिवृत्त न्यायाधीश विश्‍वास चौधरी यांचे ते लहान बंधू आहेत.

जगदीश चौधरी यांनी भारतीय सैन्यदलात विविध पदांवर काम करतांना देश-विदेशात आपल्या कामाची अमिट मोहर उमटवली आहे. सन १९८९मध्ये त्यांनी केलेल्या युद्ध क्षेत्रातील लक्षणीय कामगिरीकरिता सेना मेडल देवून सन्मानित करण्यात आले होते. तर यंदा फेब्रुवारीच्या अखेरीस त्यांना विशिष्ट सेवा मेडलने देखील सन्मानित करण्यात आलेले आहे. आता ते सैन्यातील दुसर्‍या क्रमांकाच्या पदावर विराजमान झाले असून ही आसोद्यासह समस्त खान्देशवासियांसाठी अभिमानाची बाब होय.

अजून वाचा 

एपीआय सचिन बेंद्रेंसह सात पोलिस कर्मचारी निलंबित!

Share post
Tags: Aarmy NewsAsodaIndian AarmyJagdish ChaudhryJalgaonJalgaon Latest NewsMarathi NewsPostTreading Newsजगदीश चौधरींची सैन्यदलातील दुसर्‍या सर्वोच्च पदावर नियुक्तीदुसर्‍या सर्वोच्चपदावर नियुक्ती
Previous Post

काजलच्या घरी लगीनघाई! बहिणीने शेअर केला खास फोटो

Next Post

MI vs RCB : मुंबईकडून बंगळुरुचा 5 गडी राखून पराभव

Next Post
sport news

MI vs RCB : मुंबईकडून बंगळुरुचा 5 गडी राखून पराभव

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

© 2020 Website managed by Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय

© 2020 Website managed by Tech Drift Solutions.

Don`t copy text!
Join WhatsApp Group