Sunday, December 7, 2025
Divya Jalgaon
Advertisement
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय
No Result
View All Result
Divya Jalgaon
No Result
View All Result

एपीआय सचिन बेंद्रेंसह सात पोलिस कर्मचारी निलंबित!

चाळीसगाव तालुक्यातील मेहुणबारे येथे पडलेला गुटख्याचा ट्रक जळगाव येथे आणल्याचे प्रकरण

by Divya Jalgaon Team
October 29, 2020
in गुन्हे वार्ता, जळगाव
0
आकाशवाणी चौकातील खड्डा न दिसल्याने दुचाकीस्वाराचा अपघात वाचा सविस्तर ???? https://divyajalgaon.com/?p=4049

जळगाव ( प्रतिनिधी) – चाळीसगाव तालुक्यातील मेहुणबारे येथे पडलेला गुटख्याचा ट्रक जळगाव येथे आणल्याचे प्रकरण पोलिसांना चांगलेच भोवले आहे. याप्रकरणी पोलिस अधीक्षक डॉ.मुंढे यांनी एपीआय सचिन बेंद्रे यांच्यासह सात पोलीस कर्मचारी निलंबित केले आहे. मेहुनबारे पोलिस स्थानकाच्या हद्दीत स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने गुटख्याने भरलेला ट्रक पकडला होता. एपीआय सचिन बेंद्रेंसह सात पोलिस कर्मचारी निलंबित!

परंतु स्थानिक ठिकाणी फिर्याद न देता तो ट्रक थेट जळगाव येथे आणला जात होता. याची माहिती आमदार मंगेश चव्हाण यांना मिळाल्यानंतर त्यांनी रात्रभर ट्रकचा पाठलाग केला आणि जळगाव शहरालगत असलेल्या जैन व्हॅली जवळ तो ट्रक पकडला.

यावेळी साधारण तासभर आमदार चव्हाण यांचा पोलिसांसोबत वाद झाला. यानंतर हा ट्रक जिल्हापेठ पोलिस ठाण्यात आणण्यात आला. यावेळी आमदार चव्हाण यांनी माझी फिर्याद घ्यावी असा आग्रह धरला. यावरून पुन्हा एकदा आमदार चव्हाण आणि पोलिसांमध्ये खडाजंगी झाली. दरम्यान आमदार चव्हाण यांनी यासंदर्भात संपूर्ण घटनाक्रम विशेष पोलीस महानिरीक्षक श्री दिघावकर व पोलीस अधीक्षक डॉक्टर मुंढे यांना दिली. यानंतर दुपारी त्यांनी पत्रकार परिषद घेऊन पोलिसांवर मोठ्या प्रमाणात ताशेरे ओढत या प्रकरणात गुटखा ट्रक मालकांशी स्थानिक गुन्हे शाखेच्या कर्मचाऱ्यांच्या लागेबांधे असल्याचा गंभीर आरोप केला.

दरम्यान या ट्रकमध्ये साधारण 67 लाखाचा गुटखा आढळून आला होता. या प्रकरणाची चौकशी करण्याचे आदेश देण्यात आले होते . अखेर काल रात्री पोलीस अधीक्षक डॉक्टर मुंडे यांनी निलंबनाचे आदेश काढले. निलंबित कर्मचाऱ्यांमध्ये सपोनि सचिन बेंद्रे स्थानिक गुन्हे शाखेचे रामचंद्र बोरसे, नारायण पाटील, मनोज दुसाने यांच्यासह इतर कर्मचाऱ्यांचा समावेश आहे.

अजून वाचा 

खंडवा स्टेशन येथे बोगस तिकिट तपासणीस विरुद्ध कारवाई

Share post
Tags: 7 PoliceChalsgaon newsCrime newsJalgaonJalgaon Latest NewsMehunbare Gutkha PrakaranSuspend
Previous Post

जळगावात आज ८४ रूग्ण बाधित आढळले

Next Post

मुंबईत आतापर्यंत ८८ टक्के रुग्ण करोनामुक्त

Next Post
जिल्ह्यात आज २८८ रूग्ण कोरोनाबाधित आढळले

मुंबईत आतापर्यंत ८८ टक्के रुग्ण करोनामुक्त

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

© 2020 Website managed by Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय

© 2020 Website managed by Tech Drift Solutions.

Don`t copy text!
Join WhatsApp Group