भुसावळ – भुसावळ मंडळातील खंडवा स्टेशनवर बोगस तिकिट तपासणीस विरुद्ध कारवाई करण्यात आल्याने खळबळ उडाली . अधिक असे की , मध्य रेल्वेच्या भुसावळ मंडळातील खंडवा स्टेशनवर २६ ऑक्टोबर रोजी गाड़ी क्रमांक – 01062 मध्ये काही प्रवाशांनी गाडीचे चल तिकीट निरीक्षक यांच्या कड़े तक्रार केली कि एक व्यक्ती हि बोगस तिकीट तपासणी कर्मचारी आहे ती व्यक्ति जनरल कोच मधे तिकिट तपासणी करत असल्याची माहिती गाड़ी चे चल टिकट निरिक्षक संजय कुमार सिंह याना प्रवाशानी दिली.
त्यानी लगेच गाड़ी मधे कार्यरत असलेले चल टिकट निरीक्षक महेंद्र सालुंके याना लगेच जनरल कोच मधे जाऊन जाँच पडताळणी करण्याच्या सूचना केल्या असता सदर व्यक्ती हि तिकीट तपासणी नसून हि बोगस व्यक्ती आहे असे त्यांच्या लक्षात आले. या माहितीच्या आधारे खंडवा स्टेशन येथे चल तिकीट निरीक्षक यांनी खंडवा स्टेशन वर मुख्य तिकीट निरीक्षक (जाँच), आरपीएफ आणि जीआरपी यांच्या कडे त्या व्यक्तीला पुढील कारवाई साठी सुपूर्द करण्यात आले.