Tuesday, February 17, 2026
Divya Jalgaon
Advertisement
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय
No Result
View All Result
Divya Jalgaon
No Result
View All Result

कर्जदारांना थकबाकी फेडण्यासाठी 31 मार्चपर्यंत मुदतवाढ

कर्जदारांनी लाभ घेण्याचे सहकार विभागाचे आवाहन

by Divya Jalgaon Team
October 28, 2020
in जळगाव
0

जळगाव – भु-विकास बँकेच्या थकबाकीदार सभासदांकरीता शासन निर्णय दिनांक 24 जुलै, 2015 नुसार एकरक्कमी कर्ज परतफेड (ओ.टी.एस) योजना लागू केलेली होती.  दिनांक 20 ऑक्टोबर, 2020 रोजीच्या शासन निर्णयानुसार या योजनेतंर्गत कर्ज परतफेडीसाठी दिनांक 31 मार्च, 2021 पर्यंत मुदतवाढ देण्यात आलेली आहे.

त्यानंतर सक्तीच्या वसुलीव्दारे जमीनलिलाव करुन वसुलीची कार्यवाही केली  जाणार आहे. असे अवसायक, जळगाव जिल्हा सहकारी कृषी ग्रामीण बहुउद्देशीय विकास बँक ली., जळगाव तथा जिल्हा उपनिबंधक, सहकारी संस्था यांनी प्रसिध्दी पत्रकान्वये कळविले आहे.

जळगाव जिल्हा भु-विकास बँकेचे जिल्ह्यातंर्गत 176 सभासदांनी या योजनेचा लाभ घेतल्यास जळगाव जिल्ह्यातील बँकेच्या सभासदांना 1 कोटी 67 लाख वसुल भरावा लागेल. यामध्ये शेतक-यांना 5 कोटी 85 लाख रुपयांच्या व्याजमाफीचा लाभ मिळणार आहे.

शासनाने जाहीर केलेल्या एकरक्कमी कर्ज परतफेड योजनेमध्ये फार मोठ्या प्रमाणात सभासदांना लाभ मिळत असल्यामुळे जास्तीत जास्त कर्जदार सभासदांनी 31 मार्च, 2021 च्या आत कर्जाची परतफेड करावी. अन्यथा बँकेमार्फत सक्तीच्या वसुलीव्दारे कार्यवाही करण्यात येईल.

तरी शासनाने जाहीर केलेल्या एकरक्कमी परतफेड योजनेचा लाभ घेवून आपले शेतजमीनी वरील बँकेचा बोजा कमी करुन घेण्याचे आवाहन श्री. स.सु. बिडवई, जिल्हा उपनिबंधक, सहकारी संस्था, जळगाव यांनी केले आहे.

Share post
Tags: 31 MarchJalgaon newsJimakaLoanMarathi News
Previous Post

खंडवा स्टेशन येथे बोगस तिकिट तपासणीस विरुद्ध कारवाई

Next Post

सोयाबीन बियाणे राखून ठेवण्याचे कृषि विभागाचे आवाहन

Next Post
soybeen news

सोयाबीन बियाणे राखून ठेवण्याचे कृषि विभागाचे आवाहन

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

© 2020 Website managed by Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय

© 2020 Website managed by Tech Drift Solutions.

Don`t copy text!
Join WhatsApp Group