दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील लोकप्रिय अभिनेत्री काजल अगरवाल लवकरच विवाहबंधनात बांधली जाणार आहे. व्यावसायिक गौतम किचलूशी ती लग्नगाठ बांधणार असून काही दिवसांपूर्वीच तिने सोशल मीडियावर ही माहिती दिली. येत्या ३० ऑक्टोबर रोजी काजल आणि गौतम लग्नाची गाठ बांधणार असून त्यांच्या घरी लग्नाच्या तयारीला जोरदार सुरुवात झाली आहे. यामध्येच काजलच्या बहिणी एक खास फोटो शेअर केला आहे.काजलच्या घरी लगीनघाई! बहिणीने शेअर केला खास फोटो.
काजलच्या बहिणीने म्हणजेच निशाने काजलसोबतचा एक फोटो शेअर केला आहे. यामध्ये दोघी बहिणींची उत्तम बॉण्डिंग दिसून येत आहे. या फोटोला निशाने “That wedding glow is just a workout away. ‘मेहेंदी है रचनेवाली. #KajGautKitched’, असं कॅप्शन दिलं आहे.काजलच्या घरी लगीनघाई! बहिणीने शेअर केला खास फोटो.
दरम्यान, २९ ऑक्टोबर रोजी काजलचा मेहंदी आणि हळदी सोहळा होणार असल्याचं सांगण्यात येत आहे. काजलने मॉडेलिंगपासून तिच्या करिअरची सुरुवात केली. तिने तेलुगू, तामिळ आणि हिंदी चित्रपटांमध्ये काम केलं. ‘मगधीरा’ हा तिच्या करिअरमधील उल्लेखनीय चित्रपट आहे. २०११ मध्ये तिने ‘सिंघम’ या चित्रपटात अजय देवगणसोबत काम केलं. त्यानंतर ती ‘स्पेशल २६’ या चित्रपटातही झळकली. यामध्ये तिने अक्षय कुमारसोबत स्क्रीन शेअर केला होता.
अजून वाचा
कंगनाची ‘तेजस’च्या कामाला सुरुवात


