औरंगाबाद – सततच्या दुष्काळामुळे मराठवाडय़ाची ‘टँकरवाडा’ अशी बनलेली ओळख या वर्षी अतिवृष्टीमुळे पुसली गेली असून गेल्या पाच वर्षांत पहिल्यांदाच सर्व तालुक्यात भूजल वाढ दिसून येत आहे. सप्टेंबरअखेर ८७५ निरीक्षण विहिरींच्या नोंदीची गेल्या पाच वर्षांतील सरासरी पाणीपातळीची तुलना केल्यानंतर त्यात ०.४० मीटरची वाढ दिसून आली आहे. भूगर्भातील पाणीपातळीमध्ये सर्वाधिक वाढ औरंगाबाद जिल्ह्य़ात ५.१३ मीटरची दिसून आली असून सर्वात कमी वाढ बीड जिल्ह्य़ात ०.४० एवढी दिसून आली आहे. एकाच ठिकाणी वेगाने पाऊस पडल्यामुळे पाणी मुरण्याचे प्रमाण तुलनेने कमी होते. पाच वर्षांत पहिल्यांदाच मराठवाडय़ातील भूजल पातळीत वाढ.
मात्र सरासरीपेक्षा २१५ टक्के अधिक पाऊस झाल्याने मराठवाडय़ातील बहुतांश नदी-नाले दुथडी भरून वाहिले. तसेच, ऑक्टोबपर्यंत मोठा पाऊस झाल्याने पाणीपातळीतील वाढ निरीक्षण विहिरीच्या माध्यमातून दिसून आली नसल्याचे सांगण्यात येत आहे. पाच वर्षांत पहिल्यांदाच मराठवाडय़ातील भूजल पातळीत वाढ.
एक जून ते ३० सप्टेंबर या कालावधीमध्ये अतिवृष्टी म्हणजे ६५ मिलिमीटरपेक्षा अधिक पाऊस झालेल्या महसूल मंडळाच्या नोंदीही महसूल प्रशासनाने घेतलेल्या आहेत. त्यानुसार २०१९ मध्ये २१२ महसूल मंडळात अतिवृष्टी नोंदविण्यात आली होती. काही तालुक्यात जून ते सप्टेंबर या कालावधीमध्ये सात मीटपर्यंत पाणीपातळी वाढली आहे. मात्र, गेल्या पाच वर्षांतील पाणीपातळीच्या सरासरी नोंदी उणे असल्याने या वर्षीची वाढ कमी होत आहे.
मंगळवारी सकाळी सहा वाजता धरणातील पाणीसाठा ९९.५८ टक्के होता. दुपारी दोन वाजता धरण १०० टक्के भरले. धरणाची पूर्ण संचयपातळी ६४२.३७ मीटर इतकी असून प्रकल्पीय पाणीसाठा २२४.०९ दलघमी इतका आहे. १९८० मध्ये मांजरा धरणात पाणी साठवण्यास सुरुवात झाली. गेल्या ४० वर्षांत फक्त १३ वेळा हे धरण पूर्ण भरले व या वर्षी ही चौदावी वेळ आहे. धरण भरल्यामुळे पिण्याच्या पाण्याची टंचाई दूर होणार आहे.
अजून वाचा
मुंबईत आतापर्यंत ८८ टक्के रुग्ण करोनामुक्त