जळगाव – महापौर जयश्री महाजन यांच्याकडून शहिदांना अभिवादन. शहर महानगरपालिकेतर्फे आज दि.२३ रोजी शहिद दिनानिमित्त त्यांना अभिवादन करण्यात आले.
महापौर सौ.जयश्री महाजन यांनी प्रतिमेचे पूजन करून माल्यार्पण करीत शहिदांना अभिवादन केले. यावेळी उपआयुक्त प्रशांत पाटील, कार्यालय अधीक्षक राजेंद्र पाटील व अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.