Wednesday, February 18, 2026
Divya Jalgaon
Advertisement
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय
No Result
View All Result
Divya Jalgaon
No Result
View All Result

इंधन दरवाढ कमी करण्यासाठी काँग्रेसचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन

by Divya Jalgaon Team
March 3, 2021
in जळगाव, राजकीय, सामाजिक
0
इंधन दरवाढ कमी करण्यासाठी काँग्रेसचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन

जळगाव प्रतिनिधी । गॅस व पेट्रोल इंधनाच्या दरात दिवसेंदिवस वाढ होत आहे. इंधनाचे दर कमी करण्यात यावे अशी मागणीचे निवेदन जिल्हा काँग्रेसने आज जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांना दिले.

पेट्रोल- डिझेल शंभरी पार
देशात एकीकडे केंद्र शासन मोठमोठया उद्योगपतींचे हजारो कोटींचे कर्ज माफ करीत असतांना सर्वसामान्यांना महागाईच्या खाईत लोटत आहे. २०१४ साली मोदी सरकारने ३५ रूपयाने पेट्रोल देवु असे आश्वासन दिले होते. परंतु आज पेट्रोल- डिझेल शंभरी पार करतांना दिसत आहे. गेल्या महिनाभरात पेट्रोल – डिझेलच्या दरात रोजच्या रोज वाढ होत असून जनसामान्यांचा खिसा खाली केला जात आहे.

इंधन दरवाढ करून जनतेची लुट
वास्तविक पाहता आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत इंधनाचे प्रति बॅरलचे दर ऐतिहासिक रित्या कमी होत आहेत. संपुर्ण देशभरात कोरोनाचा कहर सुरू असतांना उद्योगधंदे ठप्प आहेत. बेरोजगारीत भर पडत असुन महागाई प्रचंड प्रमाणात वाढली आहे. शेतमालाला बाजारपेठ व भाव नाही. देशातील वाहतुक साखळी आधीच अडचणीत असुन इंधन दरवाढीने वाहतुक दरात वाढ होवुन प्रचंड महागाई वाढणार आहे. रोजगार नसल्यामुळे जनतेचा खिसा खाली असुन केंद्र सरकार इंधन दरवाढ करून जनतेला लुटत आहे.

या दरवाढीमुळे शेतकरी, मध्यमवर्गीय, गोरगरीब, व्यापारी, कामगार असे सर्वसामान्य जनतेचे जगणे कठीण झाले असुन अवास्तव इंधन दरवाढ करण्याऱ्या मोदी शासनाचा आम्ही निषेध केला. याप्रसंगी माजी खासगदार डॉ. उल्हास पाटील, जिल्हा सरचिटणीस अजबराव पाटील, जमील शेख, अमजद पठाण, प्रदीप सोनवणे आदी पदाधिकारी उपस्थित होते.

Share post
Tags: #Petrol-Diesel PriceAbhijit RautCollectorCongressJalgaonNivedanइंधन दरवाढ कमी करण्यासाठी काँग्रेसचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन
Previous Post

सुवर्ण संधी : आता सोने ११ हजार रूपयांनी झालं स्वस्त

Next Post

देविदास वारडे यांचे निधन

Next Post
देविदास वारडे यांचे निधन

देविदास वारडे यांचे निधन

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

© 2020 Website managed by Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय

© 2020 Website managed by Tech Drift Solutions.

Don`t copy text!
Join WhatsApp Group