रत्नागिरी : रत्नागिरी जिल्ह्यात पुढील काही दिवस रात्रौ ९ ते सकाळी ५ वाजेपर्यंत संचारबंदी लागू राहील. कोणीही विनाकारण बाहेर फिरु नये. मात्र यामधून अत्यावश्यक सेवेकरीता नेमण्यात आलेले अधिकारी, कर्मचारी व वैदयकीय कारणास्तव रुग्ण व त्याच्यासोबत असलेले नातेवाईक यांना मुभा राहील.
सदर वेळेत विनाकारण फिरताना आढळल्यास अशा व्यक्तींच्या विरोधात नियमानुसार कार्यवाही करण्यात येईल, असे जिल्हाधिकारी लक्ष्मीनारायण मिश्रा यांनी आदेशात म्हटले आहे.