कासोदा तालुका एरंडोल -( प्रतिनिधी ) सध्या कोरोना ने जिल्ह्यात कहर केला असताना जिल्हाधिकाऱ्यांमार्फत कारवाई करण्याचे निर्देश आल्यानंतरही कासोदा व परिसरातील खेड्यांवर सोमवारी ग्रामपंचायत, पोलीस पाटील मार्फत दवंडी देऊन कासोदा येथील मंगळवारी भरणारा आठवडे बाजार हा बंद राहील अशा प्रकारची दवंडी सोमवारी संध्याकाळी व मंगळवारी सकाळी देण्यात आली होती तरी ही त्या दवंडी चा कुठलाही एक उपयोग न होता आठवडे बाजार नेहमीप्रमाणे भरून जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश धाब्यावर बसवत दिवसभर बाजार कोणाच्या परवानगीने सुरू होता हे मात्र अद्यापही कळू शकले नाही कारण पोलीस स्टेशनच्या हाकेच्या अंतरावर सदर बाजार गज- बजत असताना पोलिस यंत्रणेकडून ही कुठल्याही प्रकारे काहीच कारवाई करण्यात आली नाही. तसेच 70 टक्के नागरिक विना मासचेच फिरत असल्याचे यावेळी दिसून आले.
गावात माझी वसुंधरा अभियान सुरू असताना प्लास्टिक बंदीची घोषणा गेल्या दोन-तीन महिन्यांपासून ग्रामपंचायत करत आहे मात्र ग्रामपंचायत कर्मचारी तोंड पाहून प्लास्टिक बंदी संदर्भात ठराविक लोकांकडूनच दंड वसूल करत असल्याचे एका व्यावसायिकाने नाव न सांगण्याच्या अटीवर सांगितले.
आठवडे बाजार बंद असल्याबाबत ची माहिती दवंडी ने सोमवारी व मंगळवारी सकाळी दिली गेलेली होती तरी ही पोलिस यंत्रणेकडून ही कुठल्याही प्रकारे काहीच कारवाई करण्यात आली नाही. दवंडी ही नागरिकांची मजाक उडविण्यासाठी होती की काय अशीही चर्चा गावात सुरू आहे.
दवंडी देताना बाजार बंदचे आवाहन करण्यात येत होते परंतु आठवडे बाजार नियमित जागेवर नियमित पणाने भरवण्यात आला होता आता याबाबत जिल्हाधिकारी काय निर्णय घेतात याकडे परिसरातील ग्रामस्थांच्या नजरा लागल्या आहेत.