Sunday, December 7, 2025
Divya Jalgaon
Advertisement
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय
No Result
View All Result
Divya Jalgaon
No Result
View All Result

पाचोरा तालुक्यातील खेडगाव (नंदीचे) येथे भव्य आरोग्य शिबीर

४१३ रुग्णांची झाली आरोग्य तपासणी!

by Divya Jalgaon Team
February 23, 2021
in आरोग्य, जळगाव, सामाजिक
0
पाचोरा तालुक्यातील खेडगाव (नंदीचे) येथे भव्य आरोग्य शिबीर

पाचोरा, (अनिल येवले) – तालुक्यातील खेडगाव (नंदीचे) येथे भव्य आरोग्य शिबीराचे दि. २२ फेब्रुवारी रोजी आयोजन करण्यात आले होते. या शिबिरात परिसरातील सुमारे ४१९ रुग्णांची विविध आजाराची आरोग्य तपासणी करण्यात आली.

छत्रपती शिवाजी महाराज जन्मोत्सव सोहळ्यानिमित्त आयोजित या शिबिराला धुळे येथील जवाहर मेडिकल, एस. सी. पी. एम. मेडिकल कॉलेज व विघ्नहर्ता मल्टीस्पेशालिटी हाॅस्पिटल,पाचोरा यांचे संयुक्त विद्यमाने तसेच कैलास कुमावत व नंदकेश्वर युवा फाऊंडेशन खेडगाव (नंदीचे) यांच्या सहकार्याने भव्य मोफत आरोग्य निदान शिबीराचे खेडगाव नंदीचे येथील एच बी हायस्कूल मध्ये आयोजन करण्यात आले होते. शिबिराच्या अध्यक्षस्थानी भाजपा तालुकाध्यक्ष अमोल शिंदे तर प्रमुख पाहुणे म्हणून जिल्हा परिषद सदस्य पदमसिंग पाटील, मधुकर काटे, विघ्नहर्ता मल्टीस्पेशालिटी हाॅस्पिटलचे संचालक डॉ. भुषण मगर, प्रा. डॉ. अस्मिता पाटील, खेडगाव (नंदीचे) सरपंच स्वाती कैलास कुमावत, युवानेते सुमित किशोर पाटील, राष्ट्रवादी काँग्रेस विधानसभा क्षेत्र प्रमुख नितीन तावडे, शिवसेना तालुकाप्रमुख शरद पाटील, जिल्हा परिषद सदस्य दिपक राजपूत हे उपस्थित होते तर खेडगाव नंदीचे येथील ग्रामपंचायत सदस्य तथा माजी सैनिक भटू सिंग पाटील, प्रदिप अण्णा पाटील,अशोक महाजन, अभिमान बाविस्कर, सरलाबाई बापू पाटील, सौ नूतन संदीप संघवी तसेच गावातील महिला बंधू भगिनी यांची प्रार्थनीय उपस्थिती होती.

या मोफत आरोग्य तपासणी शिबिरात स्त्रीरोग, अस्थीरोग, नेत्ररोग, हृदयरोग, बालरोग, गर्भवती महिलांची तपासणी, नाक, कान, घसा रोग यासह अन्य दुखणे, व्याधी तसेच सर्व लहान – मोठे आजारावर खेडगाव गावातील व परिसरातील सुमारे ४१३ रुग्णांची आरोग्य तपासणी करण्यात आली. याकामी धुळे येथील जवाहर मेडिकल फाउंडेशनचे अध्यक्ष डॉ. भाईदास पाटील, उपाध्यक्ष तथा आमदार कुणाल पाटील, डॉ. विजय पाटील व पाचोरा येथील विघ्नहर्ता मल्टीस्पेशालिटी हाॅस्पिटलचे डॉ. भुषण मगर यांचे मार्गदर्शनाखाली फाउंडेशनचे डॉ. सुजर काशिद, डॉ. आशिष ऊंद्रे, डॉ. श्रुती पाटील, डॉ. सुरज निकम, डॉ. मोहम्मद साकीब, डॉ. सुरज पावरा, जनसंपर्क अधिकारी जागृती बोरसे, प्रविण खरे, रुग्ण मित्र अनिल पाटील, विघ्नहर्ता मल्टीस्पेशालिटी हाॅस्पिटलचे डॉ. उमर शेख, जितेश पाटील, डॉ. अमित खरे, डॉ. जितु भावसार यांनी सहकार्य केले. आरोग्य शिबीर यशस्वीतेसाठी नांद्रा पी. एच. सी. चे वैद्यकीय अधिकारी डॉ. सागर सय्यासे, लॅब टेक्निशियन सुधीर सोनकुळ, सुपरवायझर राजु महाजन, आरोग्य सेविका श्रीमती पी. एन. चौधरी,खेडगाव, नंदीचे, उपकेंद्र मदतनिस सरला पाटील, आशा स्वयंसेविका सुलभा पाटील, संगिता कोळी, आरोग्य सेवक राहुल सोनवणे तर नंदकेश्वर युवा फॉउंडेशन चे अद्यक्ष सचिन पाटील त्याच बरोबर संदीप राजपूत एस आर पाटील विजय धमाले अजय फरगडे रवींद्र कोळी अभिमान दत्तू ढमाले पिंटू गुजर नंदू पाटील व तसेच नंदिकेश्वर युवा फाउंडेशन चे सदस्य व कार्यकर्ते यांनी परिश्रम घेतले आहेत.

Share post
Tags: Anil YeoleJalgaonMarathi NewsPachora Newsपाचोरा तालुक्यातील खेडगाव (नंदीचे) येथे भव्य आरोग्य शिबीर
Previous Post

सर्पदंश झालेल्या बालिकेला मृत्यूच्या दाढेतून बाहेर काढले

Next Post

Breaking : रत्नागिरी जिल्ह्यात रात्रीची संचारबंदी लागू

Next Post
जळगाव जिल्ह्यात 1 मे पर्यंत कलम 144 लागू

Breaking : रत्नागिरी जिल्ह्यात रात्रीची संचारबंदी लागू

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

© 2020 Website managed by Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय

© 2020 Website managed by Tech Drift Solutions.

Don`t copy text!
Join WhatsApp Group