जळगाव – पणन हंगाम २०१९-२० (रब्बी) अंतर्गत खरेदी केलेले भरडधान्य (ज्वारी व मका) सार्वजनिक वितरण व्यवस्थेअंतर्गत वाटप करण्याबाबत शासनाचे निर्देश आहेत. त्यानुसार भरडधान्य गव्हाचे परिमाण कमी करुन त्याच प्रमाणात भरडधान्य (ज्वारी व मका) वाटप करण्याच्या सुचना आहेत.
त्यानुषगाने माहे नोव्हेंबर २०२० च्या नियतनात भरडधान्य (ज्वारी व मका) अंत्योदय अन्न योजना कार्डधारकांना वितरीत करण्यात येणार आहे. त्यानुसार अंत्योदय योजना कार्डधारकांसाठी गहू १० कि.ग्रॅ. २ रु. प्रति किग्रॅ.दराने, ज्वारी ५ कि.ग्रॅ १ रु. प्रति कि. ग्रॅ.दराने, मका १० कि.ग्रॅ. १ रु प्रति कि. ग्रॅ. दराने व तांदुळ १० कि.ग्रॅ. 3 रु प्रति कि. ग्रॅम या दराने प्रतिकार्ड वितरीत करण्या येणार आहे. याचा पात्र लाभार्थ्यांनी लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी केले आहे.