Saturday, December 6, 2025
Divya Jalgaon
Advertisement
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय
No Result
View All Result
Divya Jalgaon
No Result
View All Result

अशासकीय सदस्यांच्या नियुक्त्यांसाठी प्रस्ताव सादर करावा

by Divya Jalgaon Team
October 27, 2020
in जळगाव
0

जळगाव – राज्य सल्लागार मंडळ व दिव्यांग संशोधन समितीची स्थापना करण्याच्यादृष्टीने या मंडळ/समित्यांचे पुर्नगठन करण्याकरिता दिव्यांग कल्याण क्षेत्रात कार्यरत नामवंत व तज्ज्ञ व्यक्ती, दिव्यांग व्यक्ती व दिव्यांगाच्या स्वयंसेवी संस्थाचे प्रतिनिधीत्व करणारे दिव्यांग पदाधिकारी व सदस्य यांचे नियुक्तीकरिता प्रस्ताव मागविण्यात येत आहे. महाराष्ट्र राज्य सल्लागार मंडळाकरिता दिव्यांग व्यक्ती हक्क अधिनियम २०१६ मधील ६६ च्या उपकलम २ मधील (ई) अन्वये नियुक्तीकरिता सदस्यांची नावे, पत्ता, भ्रमणध्वनी क्रमांक तसेच त्यांची संक्षिप्त माहिती व उल्लेखनीय कामगिरीची माहिती देण्यात यावी. असे विजय रायसिंग, जिल्हा समाजकल्याण अधिकारी, जिल्हा परिषद, जळगाव यांनी कळविले आहे.

दिव्यांगत्व व त्यांचे पुनर्वसन या क्षेत्रातील तज्ज्ञ असतील अशा ५ व्यक्ती, राज्य शासनाने विहित केलेल्या आळीपाळीने (रोटेशन पध्दतीने) जिल्ह्यांचे प्रतिनिधीत्व करणेसाठी नामनिर्देशित करावयाचे असे ५ प्रतिनिधी/व्यक्ती, (जिल्हा प्रशासनाकडुन‍ शिफारस केली नसल्यास नामनिर्देशन करता येणार नाही.), दिव्यांगत्वाशी  संबधित असणा-या अशासकीय संस्था किंवा दिव्यांगत्व असणा-या व्यक्तींच्या संस्थांचे प्रतिनिधीत्व करण्यासाठी शक्य असेल इतके १० दिव्यांग व्यक्ती (या उपखंडाखाली सदस्य म्हणुन नामनिर्देश करण्यात येणा-या १० व्यक्ती पैकी कमीतकमी ५ व्यक्ती महिला आणि कमीतकमी एक व्यक्ती अनु.जाती व अनु. जमाती पैकी असावी अशी तरतूद आहे. ३ पेक्षा जास्‍त नसतील असे राज्यस्तरावरील वाणिज्य व उद्योग  संघाचे ३ प्रतिनिधी यांनी अर्ज करावेत.

महाराष्ट्र शासनाने नामनिर्देशनाने वैज्ञानिक/संशोधक यामधुन नियुक्त केलेले ३ सदस्य (परंतु सदरचे वैज्ञानिक/संशोधक यांचे संशोधनास केंद्र किंवा राज्य शासनाच्या कायद्यान्वये स्थापित नामांकीत (अधिकृत) संस्थेने मान्यता दिलेली असणे आवश्यक आहे), अधिनियमातंर्गत निर्दिष्ठ केलेल्या दिव्यांग प्रकारातील तज्ज्ञ व्यक्ती ४ सदस्य (परंतु अधिनियमातंर्गत निर्दिष्ठ केलेल्या कोणत्याही दिव्यांगत्वाच्या प्रकारातील वैज्ञानिक व अथवा तज्ञ व्यक्ती असेल व अधिनियमातंर्गत निदीष्ट केलेल्या दिव्यांगत्वाच्या प्रकारातील दिव्यांगत्व धारणकरीत असेल अशा व्यक्तीस प्राधान्य दिले जाईल.

वरिलप्रमाणे प्रस्ताव दिनांक २८ ऑक्टोबर, २०२० पर्यत संक्षिप्त माहितीसह ३ प्रतीमध्ये कार्यालयीन वेळेत जिल्हा समाज कल्याण विभाग, जिल्हा परिषद, जळगाव या कार्यालयात स्वीकारण्यात येतील. असे जिल्हा समाज कल्याण अधिकारी, जिल्हा परिषद, जळगाव यांनी  कळविले आहे.

Share post
Tags: Jalgaon newsJimaka
Previous Post

अंत्योदय अन्न योजनेचे नोव्हेंबर महिन्याचे नियतन मंजूर

Next Post

विक्रेत्यांनी मास्कची विक्री किंमत दर्शनी भागावर लावणे बंधनकारक

Next Post
mask news

विक्रेत्यांनी मास्कची विक्री किंमत दर्शनी भागावर लावणे बंधनकारक

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

© 2020 Website managed by Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय

© 2020 Website managed by Tech Drift Solutions.

Don`t copy text!
Join WhatsApp Group