जळगाव प्रतिनिधी । राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाच्यावतीने मौलाना अबुल कलाम आझाद यांना पुण्यतिथी निमित्त अभिवादन करण्यात आले. राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष रविंद्र पाटील यांच्या हस्ते माल्यार्पण करण्यात आले.
पहिले जळगाव राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष स्व. विश्वनाथ भाऊ इंगळे यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. सेवादलाचे जिल्हाध्यक्ष वाय. जी. महाजन सर मीनाक्षी चव्हाण यांनी मौलाना अबुल कलाम आझाद यांच्या शैक्षणिक सामाजिक व राजकीय क्षेत्रातील केलेल्या भरीव कार्याचा आढावा घेतला. याप्रसंगी जिल्हा सेक्रेटरी अशोक पाटील, सलीम इनामदार, डॉ. रिज़वान खटीक, ममता तडवी, जुलेखा शाह, पीनाज़ फनिबन्दा, लता पाटील, उज्वला शिंदे, रोहन, गणेश निंबाळकर, संजय चौहाण, अशोक लाड़वंजारी, अरविंद बंगाली, सुनील माळी, दिलीप महेश्वरी, जॉन अन्थोनी, जय प्रकाश महाडीक आदी उपस्थित होते.