जळगाव : येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त मुख्य प्रवेशद्वाराजवळ झालेल्या कार्यक्रमात अभिवादन करण्यात आले. अधिष्ठाता डॉ. जयप्रकाश रामानंद, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.एन.एस.चव्हाण यांच्या हस्ते महाराजांच्या अर्धपुतळ्याला माल्यार्पण करण्यात आले.
सुरुवातीला मान्यवरांचे हस्ते दीपप्रज्वलन करून उद्घाटन करण्यात आले. यावेळी डॉ.संदीप पाटील, डॉ.अमित वाघदे, डॉ.बाळासाहेब सुरोशे, डॉ.रेणुका भंगाळे, इंदुमती घोरपडे, विजया विसपुते, समाजसेवा अधीक्षक संदीप बागुल, जनसंपर्क सहाय्यक विश्वजीत चौधरी, स्वच्छता निरीक्षक बापू बागलाणे, प्रकाश सपकाळ आदी उपस्थित होते.