जळगाव- भारतीय हवामान खात्यामार्फत जळगाव जिल्ह्यात दिनांक १२-१०-२०२० ते १६- १०-२०२० या कालावधीत वादळी वाऱ्यासह जोरदार तसेच हलक्या व मध्यम पावसाची शक्यता वर्तवली आहे. संभाव्य क्षेत्र बाधित होण्याची शक्यता असल्यामुळे त्या भागातील लोकांना संभाव्य धोक्याचा इशारा देण्यात आला आहे.
तसेच हा धोका लक्षात घेऊन जीवित हानी व वित्त हानी टाळण्याच्या दृष्टीने संबंधित विभागाकडून आवश्यक उपाययोजना करण्यात याव्यात तसेच शोध व बचाव पथक, बचाव साहित्य इ. सुविधा तत्पर ठेवण्यात याव्यात.
शहरी विभागात महानगरपालिका
शहरी विभागात महानगरपालिका आयुक्तांनी त्यांचे सर्व कर्मचारी आपत्कालीन परिस्थिती उदभवल्यात पूर्ण वेळ उपलब्ध असतील. तसेच झाडे पडणे,इमारती पडणे इ. परिस्थितीत शोध व बचाव कार्य तातडीने करतील याचे योग्य नियोजन करावे. अतिवृष्टीमुळे ठिकठिकाणी अडकलेल्या लोकांची तातडीने सुटका करण्यासाठी त्यांना सुरक्षित ठिकाणी हलवण्यात करिता रुग्णवाहिका, पट्टीचे पोहणारे, आरोग्य अधिकारी, जेसीबी मशीन इत्यादी बाबी सज्ज ठेवण्यात याव्यात.
सार्वजनिक परिवहन सेवा यांच्यात योग्य समन्वय ठेवून अतिवृष्टीमुळे बाधित झालेल्या क्षेत्रात प्रवास करण्यात येऊ नये, याबाबत आवश्यक सूचना देण्यात याव्यात जेणेकरून आपत्कालीन परिस्थिती उद्भवल्यास प्रतिसाद यंत्रणा आवश्यक साधनसामग्री यांची वाहतुक क्षेत्रात सुरळीतपणे येऊ शकेल.