जळगाव – के.सी.ई. कॉलेज ऑफ इंजिनीरिंग अँड मॅनेजमेंट जळगाव येथे आयआयटी मुंबई यांच्या संलग्न एफओएसएस फ्री ओपन सोर्स सॉफ्टवेअर (एफओएसएस) सेंटरचे उद्घाटन नुकतेच करण्यात आले. त्याअंतर्गत ऑर्डिनो या विषयावर आधारित फॅकल्टी डेव्हलपमेंट प्रोग्रामचे के. सी. ई. कॉलेज ऑफ इंजीनियरिंग अँड मॅनेजमेंट जळगाव आणि स्पोकेन ट्यूटोरियल आयआयटी बॉम्बे यांच्या संयुक्त विद्यमानाने दिनांक २ नोव्हेंबर ते ६ नोव्हेंबर या कालावधीत ऑनलाइन पद्धतीने आयोजन केलेले आहे.
प्राध्यापकांसाठी ऑर्डिनो ही जगातील सर्वात लोकप्रिय आणि सर्वाधिक वापरली जाणारी सॉफ्टवेअर प्रणाली आहे. ऑर्डिनो सॉफ्टवेअरचा उपयोग हा प्रोजेक्टमध्ये कोडींग प्रणाली वापरण्यासाठी होतो. ऑटोमेशन सिस्टिममध्येसुद्धा आर्डिनोप्रणाली मोठ्या प्रमाणात वापरली जाते. आर्डिनो सॉफ्टवेअरचा उपयोग करून प्राध्यापकांना व विद्यार्थ्यांना उपयुक्त असे अनेक संशोधनपर प्रकल्प तयार करता येतात.
महाविद्यालयाचे प्राचार्य श्री. डॉ. के.पी. राणे यांनी आवाहन केले आहे की, विभागातील शिक्षकांनी व प्राध्यापकांनी या कार्यशाळेचा लाभ घ्यावा,ज्यामुळे प्राध्यापकांना नवनवीन संशोधन प्रकल्प करण्यात मदत होईल. याबाबतची अधिक माहिती महाविद्यालयाच्या संकेतस्थळावर (www.coem.kces.in) उपलब्ध आहे या कार्यक्रमासाठी प्रा. डॉ. संजय सुगंधी , प्रा. संजय दहाड , प्रा. डॉ. प्रज्ञा विखार व प्रा. कल्पेश महाजन यांचे सहकार्य लाभणार आहे. प्रा. राहुल पाटील हे फॅकल्टी डेव्हलपमेंट प्रोग्रामचे कोऑर्डिनेटर म्हणून काम पाहत आहेत.