जळगाव प्रतिनिधी । जिल्ह्यातील कोरोना बाधीतांची संख्या वाढत असतांना आज दिवसभरात नवीन १५२ कोरोना बाधीत रूग्ण आढळून आले आहेत.
जिल्ह्यातील रूग्णांची संख्या हळूहळू वाढीस लागली आहे. गेल्या काही दिवसांपासून सातत्याने रूग्णांच्या संख्येत वाढ होऊ लागली आहे. या अनुषंगाने गत २४ तासांमध्ये जिल्ह्यात तब्बल १५२ नवीन कोरोना बाधीत आढळून आले आहेत. तर चोवीस तासांमध्येच जिल्ह्यातील ३९ रूग्ण बरे झाले आहेत.
दरम्यान, आज आढळून आलेल्या रूग्णांमध्ये जळगाव शहरातील सर्वाधीक ७९ रूग्ण आहेत. उर्वरित जिल्ह्याचा विचार केला असता, चाळीसगाव तालुक्यात २२ व भुसावळात १४ रूग्ण आढळून आले आहेत. उरलेले रूग्ण हे विविध तालुक्यांमधील आहेत. दिलासा देणारी बाब म्हणजे जिल्ह्यात गत २४ तासांमध्ये कोरोनामुळे एकही मृत्यू झालेला नाही.