नवी दिल्ली, वृत्तसंस्था : सध्या शहरापासून खेड्यापाड्यांपर्यंत प्रत्येक घरात एलपीजी सिलेंडर (LPG Gas Cylinder) वापरला जातो. दरम्यान या महिन्यात सरकारने एलपीजीच्या किंमतीत 50 (LPG Price Hike) रुपयांची वाढ केली आहे. या वाढीनंतर सबसिडी नसणाऱ्या 14.2 किलो एलपीजी गॅस सिलेंडर (Gas cylinders) ची किंमत 769 रुपयांवर गेली आहे. या महिन्यात गॅस सिलेंडरच्या किंमतींत झालेली दुसरी वाढ आहे. या महिन्यात एलपीजीच्या किंमतीत पहिल्यांदा 25 रुपये आणि नंतर 50 रुपयांची वाढ करण्यात आली. परंतु तुम्ही आता हा सिलेंडर 69 रुपयांमध्ये खरेदी करू शकता. जाणून घ्या या ऑफरचा कसा फायदा घ्याल.
पेटीएम (Paytm) तुम्ही एलपीजी सिलेंडर बुक करुन 700 रुपयांपर्यंतचा कॅशबॅक मिळवू शकता. देशातील बहुतेक ठिकाणी 700 ते 769 रुपयांच्या दरम्यान एलपीजी गॅसची किंमत असताना पेटीएमच्या विशेष कॅशबॅकचा फायदा घेऊन तुम्ही ते फक्त 69 रुपयांमध्ये खरेदी करू शकता.
28 फेब्रुवारीपर्यंत वैध आहे ही खास ऑफर
पेटीएमवरून पहिल्यांदा एलपीजी गॅस बुक करणाऱ्या ग्राहकांनाच 700 रुपयांचा कॅशबॅक मिळणार आहे. Paytm LPG Cylinder Booking Cashback Offer चा लाभ तुम्ही 28 फेब्रुवारीपर्यंतच घेऊ शकता. या ऑफरसाठी पेटीएमने अनेक गॅस कंपन्यांशी करार केला आहे