Tuesday, February 17, 2026
Divya Jalgaon
Advertisement
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय
No Result
View All Result
Divya Jalgaon
No Result
View All Result

Audio Clip : आरोग्यमंत्री राजेश टोपेंच्या आवाजात ऑडिओ क्लिप व्हायरल

by Divya Jalgaon Team
February 18, 2021
in आरोग्य, प्रशासन, राज्य
0
आता 500 रुपयांत होणार कोरोनाची आरटीपीसीआर चाचणी

मुंबई, वृत्तसंस्था : पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणी शिवसेनेचे नेते आणि वनमंत्री संजय राठोड यांची फोन संभाषणाची ऑडिओ क्लीप व्हायरल झाली आहे. या क्लीपमुळे संजय राठोड अडचणीत सापडले आहे. तर दुसरीकडे राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांच्या आवाजातील एक ऑडिओ क्लिप व्हायरल झाल्याचे समोर आले आहे.

‘मास्क न वापरणाऱ्यांविरुद्ध कारवाई करण्याबाबत सध्या सोशल मीडियावर एक ऑडिओ क्लिप माझ्या नावाने व्हायरल होत आहे. मात्र, त्या क्लिपमधील आवाज माझा नाही’ असं राजेश टोपे यांनी स्पष्ट केले आहे.

कोरोनाबाबत कोणताही मोठा निर्णय असेल अथवा खबरदारीच्या काही सूचना असतील तर राजेश टोपे हे पत्रकार परिषद घेऊन माहिती देत असतात. पण, काही अज्ञात भामट्यांनी त्यांच्या आवाजाची ऑडिओ क्लीप व्हायरल केली आहे.

मास्क न वापरणाऱ्यांविरुद्ध कारवाई करण्याबाबत सध्या सोशल मीडियावर एक ऑडिओ क्लिप माझ्या नावाने व्हायरल होत आहे. मात्र त्या क्लिपमधील आवाज माझा नाही.

— Rajesh Tope (@rajeshtope11) February 17, 2021

‘पुन्हा लॉकडाऊन लागू देऊ नका’

दरम्यान, कोरोनाविषयक सर्वत्र दाखविल्या जाणाऱ्या बेफिकीरीबाबत चिंता व्यक्त करतानाच कोरोना नियंत्रणासाठी लागू असलेल्या नियमावलीची (एसओपी ) कडक अंमलबजावणी करावी, असे निर्देश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी प्रशासनाला दिले. मास्क वापरा, गर्दी टाळा अन्यथा पुन्हा एकदा लॉकडाऊनला सामोरे जावे लागेल, असा इशाराही मुख्यमंत्री ठाकरे यांनी दिला. सार्वजनिक कार्यक्रम, सभा, विवाह समारंभ आदींमध्ये उपस्थितांची संख्या मर्यादित ठेवतानाच मास्क वापरणे बंधनकारक आहे. जे नियमाचे पालन करणार नाही त्यांच्यावर दंडात्मक कारवाई करण्याचे निर्देशही मुख्यमंत्री ठाकरे यांनी दिले.

‘गेल्या काही महिन्यांमध्ये कोरोनाच्या रुग्णसंख्येत घट आल्याने नागरिकांमध्ये बेफीकीरी आली आहे त्यामुळे कोरोना प्रतिबंधासाठीच्या सूचनांचे पालन होताना दिसत नाही. लोकांमध्ये जरी शिथिलता आली असली तरी यंत्रणांमध्ये ती येऊ देऊ नका. नियमांची कडक अंमलबजावणी करा’, असे निर्देश मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिले.

‘राज्यात सार्वजनिक ठिकाणी कोरोना नियमांचे पालन होताना दिसत नाही. त्यामुळे आंदोलने, सभा, मिरवणुका यांना परवानगी देऊ नये. विवाह समारंभामध्ये उपस्थितांच्या मर्यादेचे पालन केले जाते का याची यंत्रणेकडून तपासणी झाली पाहिजे. ज्या भागात रुग्ण संख्या वाढतेय तेथे कंटनेमेंट झोन करायची तयारी ठेवावी, असंही मुख्यमंत्री ठाकरे यांनी सांगितले.

Audio Clip :

https://divyajalgaon.com/wp-content/uploads/2021/02/Rajesh-Tope.ogg

Share post
Tags: #Audio Clip Viral#Rajesh TopeAudio Clip : आरोग्यमंत्री राजेश टोपेंच्या आवाजात ऑडिओ क्लिप व्हायरलMarathi NewsMumbai
Previous Post

गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या सुरक्षा गार्डचे अपघाती निधन

Next Post

769 रुपयांचा गॅस सिलेंडर मिळेल 69 रुपयांत, अशाप्रकारे होईल फायदा

Next Post
सामान्यांना फटका, 3 महिन्यात 200 रुपयांनी गॅस महागला

769 रुपयांचा गॅस सिलेंडर मिळेल 69 रुपयांत, अशाप्रकारे होईल फायदा

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

© 2020 Website managed by Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय

© 2020 Website managed by Tech Drift Solutions.

Don`t copy text!
Join WhatsApp Group