Saturday, December 6, 2025
Divya Jalgaon
Advertisement
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय
No Result
View All Result
Divya Jalgaon
No Result
View All Result

गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या सुरक्षा गार्डचे अपघाती निधन

by Divya Jalgaon Team
February 18, 2021
in गुन्हे वार्ता, राज्य
0
गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या सुरक्षा गार्डचे अपघाती निधन

मुंबई, वृत्तसंस्था : गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या सुरक्षा गार्डचे अपघातात निधन झाल्याची माहिती समोर आली आहे. संजय धनराज नारनवरे, असे सुरक्षा गार्डचे नाव असून ते अनिल देशमुख यांच्या नागपूरमधील सिव्हिल लाईन्स भागात असलेल्या निवासस्थानी कार्यरत होते. बुधवारी रात्री ते मोटरसायकलने कर्तव्यावर हजर राहण्यासाठी घरुन निघाले. मात्र, नांदगाव फाटा परिसरात येताच त्यांच्या दुचाकीला एका ट्रकने धडक दिली. त्या धडकेत त्यांच्या दुर्दैवी मृत्यू झाला आहे.

काय म्हणाले अनिल देशमुख?

गृहमंत्री अनिल देशमुख यांनी याबाबतची माहिती त्यांच्या ट्विटरद्वारे दिली आहे. ते म्हणाले की, ‘माझ्या नागपूरच्या निवासस्थानी बंगला सुरक्षा गार्ड म्हणून कार्यरत असणारे पोलीस अंमलदार संजय नारनवरे यांचे अपघातात दुःखद निधन झाले. त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली! आम्ही त्यांच्या कुटुंबीयांच्या दुःखात सहभागी आहोत. संजय यांच्या जाण्याने आम्ही आमच्या घरातील एक सदस्य आज गमावला आहे.’

ट्रकचालकाच्या शोधासाठी नाकाबंदी

संजय नारनवरे यांचा कोराडी मार्गावरील नांदगाव फाटा येथे रात्री नऊ वाजण्याच्या सुमारास अपघात झाला. या अपघाताची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यानंतर पोलिसांनी पंचनामा करुन मृतदेह मेयो रुग्णालयात पाठवला. मात्र, या दरम्यान ट्रक चालक पसार झाला होता. या चालकाला पकडण्यासाठी पोलिसांनी संपूर्ण शहरात नाकाबंदी केली आहे.

माझ्या नागपूरच्या निवासस्थानी बंगला सुरक्षा गार्ड म्हणून कार्यरत असणारे पोलीस अंमलदार संजय नारनवरे यांचे अपघातात दुःखद निधन झाले. त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली! आम्ही त्यांच्या कुटुंबीयांच्या दुःखात सहभागी आहेत. संजय यांच्या जाण्याने आम्ही आमच्या घरातील एक सदस्य आज गमावला आहे. pic.twitter.com/8zmrR0Tjkn

— ANIL DESHMUKH (@AnilDeshmukhNCP) February 17, 2021

Share post
Tags: #GuardAccidentAnil DeshmukhDeathMarathi NewsMumbaiगृहमंत्री अनिल देशमुख यांच्या हस्ते मोक्षदा पाटील यांचा सत्कार
Previous Post

खडसेंच्या भूखंडप्रकरणी देवेंद्र फडणवीस यांचीही साक्ष नोंदवा

Next Post

Audio Clip : आरोग्यमंत्री राजेश टोपेंच्या आवाजात ऑडिओ क्लिप व्हायरल

Next Post
आता 500 रुपयांत होणार कोरोनाची आरटीपीसीआर चाचणी

Audio Clip : आरोग्यमंत्री राजेश टोपेंच्या आवाजात ऑडिओ क्लिप व्हायरल

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

© 2020 Website managed by Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय

© 2020 Website managed by Tech Drift Solutions.

Don`t copy text!
Join WhatsApp Group