Saturday, December 6, 2025
Divya Jalgaon
Advertisement
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय
No Result
View All Result
Divya Jalgaon
No Result
View All Result

धक्कादायक : शेतात आढळले 2 मुलींचे मृतदेह तर तिसरीची मृत्युशी झुंज

by Divya Jalgaon Team
February 18, 2021
in गुन्हे वार्ता, राष्ट्रीय
0
धक्कादायक : शेतात आढळले 2 मुलींचे मृतदेह तर तिसरीची मृत्युशी झुंज

नवी दिल्ली, वृत्तसंस्था – उत्तर प्रदेशमध्ये एक भयंकर घटना समोर आली आहे. उन्नाव पुन्हा एकदा हादरले आहे. उत्तर प्रदेशमधील उन्नाव जिल्ह्यामध्ये शेतात दोन मुलींचे मृतदेह आढळले असून तिसऱ्या मुलीची मृत्यूशी झुंज सुरू आहे. तीन अल्पवयीन मुली शेतात ओढणीला बांधलेल्या अवस्थेत आढळून आल्याने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. असोहा पोलीस स्टेशन परिसरातील बबुरहा या गावात ही धक्कादायक घटना घडली आहे. पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत. तसेच प्राथमिक तपासादरम्यान विषबाधेने मृत्यू झाल्याचं समोर येत असलं तरी पोलीस अधिक चौकशी करत आहेत.

जंगलामध्ये संशयास्पद अवस्थेत तीन मुली आढळून आल्या. घटनेची माहिती मिळताच मुलींना लगेचच जवळच्या सार्वजनिक आरोग्य केंद्रात उपचारासाठी नेण्यात आलं. मात्र दोन मुलींना मृत घोषित करण्यात आलं. तर तिसऱ्या मुलीची प्रकृती चिंताजनक असल्याने तिला कानपूरच्या एका रुग्णालयात पाठवण्यात आलं आहे. तिन्ही मुली या आपल्या शेतात चारा आणण्यासाठी गेल्या होत्या. त्याच दरम्यान हा धक्कादायक प्रकार घडल्याचं म्हटलं जात आहे. घटनेची माहिती मिळताच डीएम आणि अन्य अधिकारी जिल्हा रुग्णालयात दाखल झाले आहे.

गाव आणि रुग्णालय परिसराच्या आसपास पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. पोलीस अधिकाऱ्यांनी असोहा पोलीस ठाण्याच्या हद्दीत तीन मुली शेतात संशयास्पद अवस्थेत आढळून आल्या आहेत. सध्या या प्रकरणात अनेकांची अधिक चौकशी केली जात असून वेगाने तपास करण्यात येत असल्याची माहिती दिली आहे. या घटनेनंतर परिसरातील लोकांमध्ये भीतीचे वातावरण असून खळबळ निर्माण झाली आहे. तर मृत्यू झालेल्या मुलीच्या कुटुंबीयांनी या तिघी जणी चारा आणण्यासाठी शेतात गेल्या असल्याचं म्हटलं आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.

आझाद समाज पक्षाचे नेते चंद्रशेखर आझाद यांनीही या घटनेवर भाष्य केलं आहे. आपल्या ट्विटर अकाऊंटवरून याबाबत एक ट्विट केलं आहे. “उत्तर प्रदेशच्या उन्नावमधील घटना अत्यंत भयावह आहे. दोन दलित मुलींचे मृतदेह सापडले आहेत. एक जखमी आहे. मुलीला एअर अ‍ॅम्ब्युलन्सद्वारे तातडीने एम्स दिल्ली येथे आणायला हवे. आम्ही आता कोणत्याही स्थितीत हाथरसची पुनरावृत्ती होऊ देणार नाही. आमची टीम घटनास्थळी जात आहे. बहिणींच्या सुरक्षिततेशी आणि सन्मानाशी कोणतीही तडजोड करणार नाही” असं चंद्रशेखर यांनी म्हटलं आहे.

बिहारमध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे. मोतिहारी येथे अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्यानंतर तिची हत्या करण्यात आली. भयंकर बाब म्हणजे हत्येनंतर मुलीचा मृतदेह जाळण्यात आला. या प्रकरणी पोलिसांनी दोघांना अटक केली आहे. मोतिहारीतील कुंडवा चैनपुर पोलीस ठाण्यातील अधिकाऱ्यासह दोघांवर या प्रकरणात कर्तव्यात कसूर आणि हलगर्जीपणा केल्याचा आरोप करण्यात आला असून कारवाई होण्याची शक्यता आहे. 21 जानेवारी रोजी ही घटना ही घटना घडली. मोतिहारीच्या कुंडवा चैनपूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत नेपाळच्या एका मुलीवर बलात्कार करून तिची हत्या करण्यात आली होती. मात्र, या प्रकरणी पोलिसांनी दोन फेब्रुवारीला एफआयआर दाखल केला होता. पीडित मुलीच्या कुटुंबीयांनी कुंडवा चैनपूर पोलिसांत तक्रार दाखल करण्याचा प्रयत्न केला होता. मात्र पोलिसांनी या प्रकरणाकडे दुर्लक्ष केलं. एफआयआर दाखल करण्यास नकार दिला होता, असा आरोप करण्यात आला आहे.

थाना असोहा क्षेत्रांतर्गत ग्राम बबुरहा में दो मृत एवं एक बेहोश लड़की मिलने के संदर्भ में SP उन्नाव द्वारा दी गई बाइट @Uppolice @dgpup @adgzonelucknow @Igrangelucknow pic.twitter.com/03y8H6gP0W

— UNNAO POLICE (@unnaopolice) February 17, 2021

Share post
Tags: crimeMarathi NewsNew Delhiधक्कादायक : शेतात आढळले 2 मुलींचे मृतदेह तर तिसरीची मृत्युशी झुंज
Previous Post

769 रुपयांचा गॅस सिलेंडर मिळेल 69 रुपयांत, अशाप्रकारे होईल फायदा

Next Post

कुख्यात गुंड मारणेसह समर्थकांवर हिंजवडीत तिसरा गुन्हा दाखल

Next Post
कुख्यात गुंड मारणेसह समर्थकांवर हिंजवडीत तिसरा गुन्हा दाखल

कुख्यात गुंड मारणेसह समर्थकांवर हिंजवडीत तिसरा गुन्हा दाखल

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

© 2020 Website managed by Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय

© 2020 Website managed by Tech Drift Solutions.

Don`t copy text!
Join WhatsApp Group