नवी दिल्ली – आपली जर आपल्या भाषेवर प्रभुत्व असेल आणि तुम्ही जर त्या भाषेचे जाणकार असाल तर आपल्याला देशाची सर्वोच्च न्यायव्यवस्था असलेल्या सर्वोच्च न्यायालयात तुम्हाला नोकरीची उत्तम संधी मिळू शकते. कारण सर्वोच्च न्यायालयात सरकारी नोकरीची उत्तम संधी उपलब्ध झाली आहे. सर्वोच्च न्यायालयात न्यायालय सहाय्यक/कनिष्ठ अनुवादक पदासाठी भरती प्रक्रिया सुरू झाली आहे.
आपल्याला या पदांवर नियुक्ती मिळविण्यासाठी लेखी परीक्षा आणि मुलाखतीत यशस्वी व्हावे लागेल. निवड झालेल्या उमेदवारांना सर्वोच्च न्यायालयाच्या निकालांचे इंग्रजीत भाषांतर करावे लागेल. यासाठी अर्ज करण्याची प्रक्रिया सुरू झाली असून नोटिफिकेशन आणि अॅप्लीकेशन फॉर्मच्या लिंक्स आम्ही तुम्हाला पुढे दिल्या आहेत.
पदाचे नाव – न्यायालय सहाय्यक (कनिष्ठ अनुवादक)
पदांची संख्या – 30
वेतनश्रेणी – दरमहा 44,900 रुपये (लेव्हल-7 प्रमाणे इतर भत्त्यांसह पगार मिळेल.)
आवश्यक पात्रता – उमेदवार हा इंग्रजी आणि संबंधित भाषेतील पदवीधर असावा. ट्रान्सलेशनचा डिप्लोमा अथवा प्रमाणपत्र अभ्यासक्रम पूर्ण केलेला असावा. उमेदवाराचे वय 18 ते 30 वर्ष असावे. तसेच केंद्र सरकारच्या नियमानुसार वयात सूट देण्यात येईल.
असा करा अर्ज – आपल्याला सर्वोच्च न्यायालयातील या पदासाठी ऑनलाईन अर्ज करावा लागेल. अर्ज करायला 15 फेब्रुवारी 2021 पासून सुरुवात झाली आहे. 13 मार्च 2021 ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे. जनरल आणि ओबीसी प्रवर्गातील उमेदवारांसाठी अर्ज शुल्क 500 रुपये, तर एससी, एसटी, दिव्यांग आणि माजी सैनिकांसाठी 250 रुपये आहे.