जळगाव : येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात दिव्यांग मंडळ येथे बुधवारी १७ फेब्रुवारी रोजी सुमारे २९४ लाभार्थ्यांनी उपस्थिती देऊन वैद्यकीय तपासणी करीत प्रमाणपत्र मिळण्याबाबतची कार्यवाही पूर्ण केली.
येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात दिव्यांग मंडळ अद्ययावत सुविधांसह कार्यान्वित झाले आहे. दिव्यांग मंडळ अंतर्गत दिव्यांग व्यक्तींना दर बुधवारी प्रमाणपत्र मिळण्याबाबतची कार्यवाही सुरु झाली. सकाळी ८ वाजेपासून नाव नोंदणी करण्यासाठी दिव्यांग बांधवानी मोठ्या संख्येने उपस्थिती दिली होती. त्यांची तज्ज्ञ डॉक्टरांकडून वैद्यकीय तपासणी सकाळी ९ ते १ वाजेदरम्यान करण्यात आली. तपासणी मुख्य गेट नं. २ कडील अधिष्ठाता कार्यालयासमोरील दिव्यांग मंडळाच्या कार्यालयात झाली.
दिवसभरात अस्थिव्यंग १०६, दृष्टीदोष ८०, कान-घसा १३, मानसिक २९ , लहान मुलांचे ६, औषधवैद्यकशास्त्र ६० अशा विविध दिव्यांगत्व असलेल्या सुमारे २९४ लाभार्थ्यांची तपासणी झाली. यावेळी तज्ज्ञ डॉ.दीपक जाधव, डॉ. मिलिंद बारी, डॉ.प्रदीप कुमार, डॉ. अंजली सिंग, डॉ. कांचन नारखेडे,डॉ. विनोंद पवार, डॉ.योगेश गांगुर्डे यांनी दिव्यांगांची तपासणी केली. कर्मचारी गोपाल सोलंकी, चेतन निकम, आरती दुसाने, दत्तात्रय पवार, विश्वजीत चौधरी यांनी सहकार्य केले.