भुसावळ (प्राची पाठक )- सेवा,संवाद,समर्पण, संघर्ष आणि सम्मान हा पाच तत्वावर आरोग्य सेवकांचे कार्य असून कोरोना काळात आरोग्य सेवकांनी केलेल्या कार्यामुळे करोना संक्रमण दर कमी झाला, असे प्रतिपादन आज भारतीय जनता पार्टी वैद्यकीय आघाडीचे उत्तर महाराष्ट्र सहसंयोजक डॉ. नितु पाटील यांनी केले.
कोरोना काळात लॉक डाऊन मध्ये नागरिकांना आरोग्यसेवा प्रशासनाच्या विविध सुविधांचा लाभ देण्यासाठी स्वतःच्या व स्वतःच्या कुटुंबाचा विचार न करता काम करणारे, अहोरात्र सर्वांसाठी निस्वार्थ भावनेने सेवा देणाऱ्या भुसावळ ग्रामीण रुग्णालय व ट्रामा सेंटर मधील कर्मचाऱ्यांचा रुग्णालयात जाऊन साई निर्मल फाउंडेशन भुसावळ यांनी कर्मवीर पुरस्कार देऊन सन्मानित केले.
लॉकडाऊन च्या काळामध्ये ग्रामीण रुग्णालयातून कोरोना बाधित रुग्णांना निस्वार्थपणे अहोरात्र आरोग्य सेवा देणाऱ्या सर्व कोरोना योद्ध्यांचा कर्मवीर पुरस्कार, देऊन त्यांचा यथोचित सन्मान करण्यात आला.
आजपावेतो संस्थेने संपूर्ण भारतामध्ये विविध क्षेत्रात कोरोनाच्या प्रतिकूल परिस्थितीमध्ये जनतेची सेवा करणारे रुग्णांची सेवा करणाऱ्या विविध क्षेत्रातील 4550 कोरोना योद्ध्यांना कर्मवीर पुरस्कार हा ई सन्मानपत्र देऊन सन्मानित केले आहे. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी नेत्र रोग तज्ञ डॉक्टर नितु पाटील हे होते.
यावेळी ग्रामीण रुग्णालय अँड ट्रॉमा सेंटरचे वैद्यकीय अधिकारी डॉक्टर मयूर चौधरी, डॉक्टर बी एच चाकूरकर,साई निर्मल फाऊंडेशनचे संस्थापक अध्यक्ष शिशिर जावळे, सामाजिक कार्यकर्ते आर के कोळी उपस्थित होते. सामाजिक संस्थांच्या भाऊ गर्दीमध्ये पडद्यामागे राहून निस्वार्थ सेवेने कार्य करणाऱ्या साई निर्मल फाऊंडेशनचे कार्य कौतुकास्पद आणि गौरवास्पद असल्याचे तसेच रुग्णसेवा आणि समाजातील शेवटच्या घटकापर्यत सर्वाना न्याय मिळवून देणं हेच प्रत्येकाच्या जीवनाचे लक्ष असाव असे प्रतिपादन डॉक्टर नितू पाटील यांनी व्यक्त केल.
याप्रसंगी पुरस्कारार्थी सुमन कसबे यांनी मनोगत व्यक्त केले , कार्यक्रमाचे सूत्रसंचालन चंद्रशेखर पाटील यांनी केले. तर प्रास्ताविक संस्था अध्यक्ष शिशिर जावळे यांनी केले. याप्रसंगी भुसावळ ग्रामीण रुग्णालय ट्रामा सेंटर चे वैद्यकीय अधिकारी बी.एच चाकूरकर, वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर मयुर चौधरी, यांच्यासह तेथील आरोग्य कर्मचाऱ्यांना कर्मवीर पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.
कार्यक्रम यशस्वीतेसाठी कार्यक्रमाचे प्रकल्प प्रमुख चंद्रशेखर पाटील सह प्रकल्प प्रमुख नरेंद्र बऱ्हाटे,सुभाष बऱ्हाटे, देवेंद्र राजपूत,एडवोकेट सागर सरोदे, प्रा. राजेंद्र पाटील,सतीश महाजन, सुभाष तांबट,कपिल पहुरकर, मोहन कासार, देवेंद्र वराडे यांनी परिश्रम घेतलेत.