Tuesday, February 17, 2026
Divya Jalgaon
Advertisement
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय
No Result
View All Result
Divya Jalgaon
No Result
View All Result

पहूर कसबेमध्ये ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी आशा जाधव

by Divya Jalgaon Team
February 16, 2021
in जळगाव, प्रशासन, राजकीय
0
पहूर कसबेमध्ये ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी आशा जाधव

जामनेर – तालुक्यात पहूर कसबे मध्ये ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी भाजपाची जागा आली असून ग्राम पंचायत सरपंचपदी आशा शंकर जाधव तर उपसरपंचपदी राजू रामदास जाधव यांची निवड झाली .

माजी पंचायत समिती सभापती बाबुराव घोंगडे यांच्या नेतृत्वाखाली गेल्या ३० वर्षांपासून ग्रामपंचायत मध्ये सत्ता असून या पंचवार्षिक निवडणुकीतही त्यांच्या राज आला. भाजपा प्रणित जय गोगडी देवळी विकास पॅनलला १७ पैकी ९ जागांवर विजय मिळाला तर शिवसेना – राष्ट्रवादी काँग्रेस -काँग्रेस महाविकास आघाडी पुरस्कृत परिवर्तन पॅनलला ६ जागा आली होती.तर राजू जाधव आणि विक्रम घोंगडे हे दोन अपक्ष उमेदवार निवडून आले होते. पहूर कसबे ग्रामपंचायतीच्या सरपंच पदासाठी सर्वसाधारण गटाचे आरक्षण जाहीर झाल्याने त्यानुसार आज सरपंच , उपसरपंच पदासाठी निवडणूक घेण्यात आली. यावेळी निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून मंडळाधिकारी प्रशांत निंबाळकर यांनी काम बघितले.

यावेळी जय गोगडी देवळी विकास पॅनल तर्फे आशा जाधव यांनी सरपंच पदासाठी अर्ज दाखल केला .तर उपसरपंच पदासाठी अपक्ष उमेदवार राजू जाधव यांनी अर्ज दाखल केला. आशा जाधव यांना १० मते मिळाली .भाजपा प्रणीत राजू जाधव यांना ९ तर आघाडीचे उमेदवार अशोक लक्ष्मण जाधव यांना ८ मत मिळाले. निवडणूक निर्णय अधिकारी यांनी सरपंचपदी आशा जाधव व उपसरपंच पदी राजू जाधव यांची निवड जाहीर केली.

यावेळी माजी पंचायत समिती सभापती बाबुराव घोंगडे , माजी जि. प. सदस्य राजधर पांढरे , प्रशासक रामचंद्र वानखेडे , लक्ष्मण गोरे , अर्जुन लहासे यांच्यासह ग्रामपंचायत सदस्य अशोक जाधव ,शेरखा तडवी , सोनू बाविस्कर ,जिजाबाई लहासे , मनिषा चौधरी , प्रतिभा बनकर , विनोद थोरात , ज्योती धनगर , अनिता लहासे , मीराबाई राऊत , विक्रम घोंगडे , वासुदेव घोंगडे , योगेश भडांगे , सुनिता गोरे यांच्यासह सर्व ग्रामपंचायत सदस्य यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

 

Share post
Tags: grampanchayat election newsjamner pahur newsग्रामपंचायतीच्या सरपंचपदी
Previous Post

महाविद्यालये आजपासून सुरु झाल्याने अभाविपतर्फे स्वागत

Next Post

शिव व्यापारी सेनेच्या फलकाचे अनावरण

Next Post
शिव व्यापारी सेनेच्या फलकाचे अनावरण

शिव व्यापारी सेनेच्या फलकाचे अनावरण

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

© 2020 Website managed by Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय

© 2020 Website managed by Tech Drift Solutions.

Don`t copy text!
Join WhatsApp Group