जळगाव प्रतिनिधी । कोरोनाच्या पार्श्वभूमीवर बंद ठेवण्यात आलेली महाविद्यालये आज या शैक्षणिक वर्षात प्रथमच ऑफलाईन सुरु झाली आहेत. यावेळी महाविद्यालायात येण्याऱ्या विद्यार्थ्यांचे अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेतर्फे स्वागत करण्यात आले.
राज्यातील शाळा सुरू करण्यात आल्या, परंतु महाविद्यालये सुरू करण्यात आली नव्हती. ती सुरू करण्यासाठी अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेतर्फे आंदोलन छेडण्यात आले होते. उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांच्या सुचनेनुसार पुन्हा महाविद्यालये आज सोमवार १५ फेब्रुवारी पासून पुन्हा सुरु झाली आहेत. राज्य सरकारच्या या निर्णयानंतर अखील भारतीय विद्यार्थी परिषदेतर्फे प्रत्येक महाविद्यालयात विद्यार्थ्यांचे जल्लोषात स्वागत करण्यात येत आहे.
यासाठी एम.जे. कॉलेजच्या प्रवेश द्वारावर रांगोळी काढण्यात आली असून विद्यार्थ्यांवर पुष्पवृष्टी करून त्यांचा स्वागत करण्यात आले आहे. याप्रसंगी महाराष्ट्र प्रदेश मंत्री सिध्येंश्वर लटपटे, महाविद्यालय अध्यक्ष रितेश महाजन, नगर विद्यार्थीनी प्रमुख वर्षा उपाध्ये, कला शाखा प्रमुख कुणाल कोळी, जिल्हा सयोजक रितेश चौधरी, महानगर मंत्री आदेश पाटील,प्रज्वल पाटील, चिराग तायडे, अश्विन वाघ, मयूर अलंकारी, महाराष्ट्र प्रदेश कार्यकारिणी सदस्य गौरवी चौधरी, हेमांगी पाटील, पवन भोई, जितेश चौधरी, चैतन्य बोरसे,जयदीप शिंपी आदी उपस्थित होते.