Monday, February 16, 2026
Divya Jalgaon
Advertisement
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय
No Result
View All Result
Divya Jalgaon
No Result
View All Result

नागपूर मडगांव रेल्वे सुरू करा : वैभव बहुतुले

by Divya Jalgaon Team
February 15, 2021
in जळगाव, प्रशासन
0
रेल्वे प्रवासात रात्री मोबाईल, लॅपटॉप चार्ज करता येणार नाही

जळगाव – रत्नागिरी जिल्ह्यातील संगमेश्वर, चिपळूण, गुहागर, खेड, मंडणगड, दापोली व सिंधुदुर्ग जिल्हातील कणकवली, कुडाळ, सावंतवाडी, वेंगुर्ले, मालवण, देवगड हे महत्वाचे ठिकाण असुन ही वेगाने विकसित होणारी शहरे आहेत दापोली येथे डाॅ बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाच्या रत्नागिरी व सिंधुदुर्ग परिसरात अनेक शाखा आहेत कोकण कृषी विद्यापीठामध्ये नाशिक, धुळे, जळगाव, बुलढाणा, अकोला, अमरावती, वर्धा, नागपूर या परिसरात येणारी लोकांची प्रवाशांची संख्या भरपूर आहे.

नाशिक येथे द्राक्षांची, धुळे व नंदुरबार येथे लाल मिरचीची मोठी बाजारपेठ, पाचोरा, चाळीसगाव, भुसावळ, जळगाव केळीची मोठी बाजारपेठ,व केळीची मोठी उत्पादन केंद्र कोकणामध्ये येणाऱ्या केळी, द्राक्षे, संत्री, लाल मिरची रत्नागिरी हापुस आंबा व सिंधुदुर्ग प्रसिध्द देवगड हापुस आंबा,मालवणी खाजा,कडक बुंदीचे लाडू, चुरमुऱ्याचे लाड, सावंतवाडी प्रसिद्ध लाकडी खेळणी या मार्केटमुळे आयात निर्यात होण्यास मदत होणार आहे,तसेच महाराष्ट्राचे आराध्य दैवत व विदर्भातील प्रसिद्ध संत गजानन महाराज मंदिर,अमरावती शहरातील वालगाव येथील संत गाडगेबाबा महाराज स्मारक ,नागपूर येथे महामानव डाॅ बाबासाहेब आंबेडकर यांची चैत्यभुमी,वर्धा येथील महात्मा गांधी यांचे सेवाग्राम, बुलढाणा येथील नांदुरा येथील १०५ फुटी हनुमानाची मूर्ती दर्शनाकरीता व पाहण्याकरिता अनेक भाविक शेगाव व बुलढाणा परिसरात येत असतात.धार्मिक क्षेत्र, उदयोग क्षेत्र, पर्यटन क्षेत्र ,शैक्षणिक क्षेत्र यांची नाळ जोडल्यामुळे प्रचंड प्रमाणात प्रवाशांची या गाडीसाठी मागणी आहे.

तसेच कोकण ते खान्देश,विदर्भ असे महाराष्ट्र दर्शन म्हणून या गाडीला थिविम, सावंतवाडी रोड, कुडाळ, कणकवली, राजापुर रोड, रत्नागिरी,संगमेश्वर रोड, चिपळूण, खेड या थांब्यावरून नागपूर करिता जाणारे असंख्य प्रवासी आहेत या भाविकांना दर्शनासाठी रत्नागिरी व सिंधुदुर्ग परिसरातून रेल्वे सेवा उपलब्ध नसल्याने द्राविडी प्राणायाम करावा लागत आहे.तरी या रेल्वेच्या प्रवाशांची मागणी आहे की हि मडगाव ते नागपूर रेल्वेसेवा प्रति आठवड्यातून बुधवार, शुक्रवार, सोमवार सुरू करण्यात यावी असा प्रस्ताव वैभव बहुतुले यांनी पाठवला आहे

Share post
Tags: Jalgaon newsMarathi Newsपर्यटनासह उद्योगधंदे वाढीसाठी नागपूर मडगांव रेल्वे सुरू करा: वैभव बहुतुले
Previous Post

नायब तहसीलदारांसह दोन लिपीक कोरोनाबाधीत आढळले

Next Post

महाविद्यालये आजपासून सुरु झाल्याने अभाविपतर्फे स्वागत

Next Post
महाविद्यालये आजपासून सुरु झाल्याने अभाविपतर्फे स्वागत

महाविद्यालये आजपासून सुरु झाल्याने अभाविपतर्फे स्वागत

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

© 2020 Website managed by Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय

© 2020 Website managed by Tech Drift Solutions.

Don`t copy text!
Join WhatsApp Group