जळगाव प्रतिनिधी । एरंडोल येथील आज प्रांत कार्यालयात नायब तहसीलदारांसह दोन लिपीक कोरोना पॉझिटिव्ह आढळल्याची बातमी समोर आली आहे.
जिल्ह्यात कोरोनाचा प्रकोप पुन्हा वाढीस लागला असून गेल्या काही दिवसांपासून कोरोना तडीपार झाला असे चित्र निर्माण झाले होते. मात्र एरंडोल येथील प्रांत कार्यालयात एक नायब तहसीलदार व दोन लिपिक नुकतेच कोरोना पॉझिटिव्ह आढळून आल्यामुळे कोरोना ने पुन्हा डोके वर काढल्याचे दिसत आहे.
एरंडोल येथील प्रांत अधिकारी विनय गोसावी यांनी कोरॊना काळात स्वतःच्या जीवाची पर्वा न करता एरंडोल धरणगाव व पारोळा तालुक्यात कोरोणा रोखण्यासाठी अहोरात्र परिश्रम घेतले. म्हणून कोरोना तालुक्यात रोखणे शक्य झाले होते. दरम्यान गेल्या आठ दिवसात ज्या नागरिकांनी एरंडोल येथे प्रांत कार्यालयात भेट दिली व वीस मिनिटे कार्यालयात थांबले त्या नागरिकांनी कोरोना चाचणी करून घ्यावी असे आवाहन प्रांत अधिकारी विनय गोसावी यांनी एका प्रेस नोट द्वारे केले आहे तसेच नागरिकांनी प्रांत कार्यालयात मास्क लावूनच यावे व काळजी घ्यावी असे कळविण्यात आले आहे.