जळगाव प्रतिनिधी । जिल्हा प्रशासनाने आज पाठविलेल्या कोरोना अहवालात जिल्ह्यातून १२४ रूग्ण नव्याने आढळून आले आहे. तर ३२ रूग्ण बरे होवून घरी परतले आहे. सुदैवाने एकाही रूग्णाचा मृत्यू झालेला नाही.
जळगाव शहर – ४५, जळगाव ग्रामीण-०, भुसावळ-१, अमळनेर-१२, चोपडा-१२, पाचोरा-४, भडगाव-०, धरणगाव-१०, यावल-०, एरंडोल-०, जामनेर-३, रावेर-२, पारोळा-५, चाळीसगाव-२८, मुक्ताईनगर-०, बोदवड-२ असे एकुण १२४ बाधित रूग्ण आढळून आले आहे.
कोरोनाच्या आजच्या अहवालात एकुण जिल्ह्यात ५७ हजार ७१५ बाधित रूग्ण आढळून आले आहे. त्यापैकी ५५ हजार ८५५ रूग्ण बरे होवून घरी परतले आहे. तर ४९३ बाधित रूग्ण उपचार घेत आहे. सुदैवाने आज एकाही रूग्णाचा मृत्यू झालेला नाही. आज जळगाव शहरासह चाळीसगाव तालुक्यात कोरोनाचे रूग्ण अधिक वाढ झाल्याचे दिसून आले आहे. अशी माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ एन.एस.चव्हाण यांनी दिली.