जळगाव प्रतिनिधी । लग्न समारंभात नाचत असतांना काही तरुणांमध्ये किरकोळ वाद झाल्याने त्या तरुणाला राग आल्याने दोन जणांनी त्याला धरून मध्यरात्रीच्या सुमारास चाकू हल्ला करून त्याला मारून टाकण्याचा प्रयत्न केला. सदरील घटना हि रविवार १४ रोजी मध्यरात्रीच्या सुमारास घडली. याप्रकरणी एमआयडीसी पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
जळगाव शहरातील तांबापुर परिसरात हि घटना घडली. जखमी तरुणाचे नाव शाहरूख उर्फ अशपाक सलीम खाटीक असे आहे. चॉपर हल्लाप्रकरणी सरजील हारुण पटवा व अमीन उर्फ बुलटे पटवा यांनी शाहरुखवर वार केले आहेत. एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शाहरुख व त्याचा मित्र अब्दुल मजीद मुक्तार बागवान हे दोघे १३ फेब्रुवारी रोजी तांबापुरातील मित्र प्रवीण वाघ याच्या लग्नात गेले होते.
यावेळी नाचत असताना शाहरुख व अमीन यांच्यात किरकोळ वाद झाले होते. हे वाद जागेवरच मिटवण्यात आले. १४ रोजी अमीन याने शाहरुखचा मित्र अब्दुल याला फोन केला. शाहरुख याला मला फोन करायला सांग असा निरोप दिला. तर १५ रोजी मध्यरात्री २.३० वाजता अमीन याने थेट शाहरुख याला फोन केला. तुझा मित्र अब्दुल याचा मोबाईल माझ्याकडे आहे, तो घेऊन जा असा निरोप दिला. त्यानुसार शाहरुख घराबाहेर पडला. यावेळी आधीच बिसमिल्ला चौकात बाहेर उभ्या असलेल्या सरजील याने शाहरुखला पकडून ठेवले तर अमीन याने कमरेतून चॉपर काढत शाहरुखवर पाच-सहा वार केले. यात शाहरुखच्या पोटावर, चेहऱ्यावर गंभीर दुखापत झाली आहे. शाहरुखच्या ओरडण्याच्या आवाजामुळे त्याची आई नसीम खाटीक बाहेर आली. यानंतर गल्लीतील इतर लोक जागे झाल्यामुळे सरजील व अमीन तेथुन पळुन गेले. दरम्यान, गंभीर जखमी असलेल्या शाहरुखवर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
या प्रकरणी नसीम खाटील यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन सरजील व अमीन यांच्या विरुद्ध एमआयडीसी पोलिस स्थानकात चाकू हल्ला व जीवे ठार मारण्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


