यावल (रविंद्र आढाळे) । धुळे जिल्ह्यातून पपई भरून येत्रणारी आयशर यावल तालुक्यातील किनगावजवळ उलटली असून यात काम करणारी १५ मजूरांचा गुदमरून जागीच मृत्यू झाल्याची दुदैवी घटना घडली आहे. डीवायएसपी नरेंद्र पिंगळे यांनी याला दुजोरा दिला आहे. याचअपघातातील दोन जण गंभीर असल्याने मृतांचा आकडा वाढण्याची भिती व्यक्त करण्यात येत आहे.
नेर (धुळे) येथून पपईने भरून आयशर रावेरला येत असतांना मध्यरात्रीच्या सुमारास किनगाव नजिक मोठाअपघात झाला आहे. आयशर पलटी झाल्याने यात असणारे १५ जण जागीच ठार झाल्याची दुदैवी घटना घडली आहे. मयत सर्व रावेर तालुक्यातील आभोडा, केहाळा व रावेर शहरातील असल्याचे वृत्त आहे. हे सर्व जण मजूर असल्याचे समजते. गाडीत एकूण २१ जण होते. यातील १५ जणांचा जागीच मृत्यू झाला असून दोन गंभीर जखमी झाले आहेत. त्यांना जळगाव जिल्हा रुग्णालयात नेले आहे.
अपघाताची माहिती मिळताच डीवायएसपी नरेंद्र पिंगळे पी आय सुधीर पाटील यांनी अपघातस्थळ गाठलेअसूनत्यांनीअपघातातीलमृतांच्या आकड्याला दुजोरा दिला आहे. अपघातात मृत झालेल्यांचे मृतदेह यावल येथील ग्रामीण रूग्णालयात आणण्यात आलेली आहेत. तर जखमींवर उपचार सुरू
आहेत.