चोपडा – चोपडा येथील पंकज प्राथमिक विद्यालयाने शिक्षण विभाग महाराष्ट्र राज्य, सलाम मुंबई फाउंडेशन ,जळगाव जिल्हा तंबाखू नियंत्रण कक्ष, जन मानवता बहुउद्देश्यीय संस्था चोपडा व साने गुरुजी फॉउंडेशन अमळनेर यांच्या सयुंक्त विद्यमाने तयार करण्यात आलेल्या नवीन 9 निकषानुसार तंबाखू मुक्त शाळा घोषित करण्यात आली आहे .
जिल्हा तंबाखू नियंत्रण समन्वय समिती सदस्य व जन मानवता बहुउद्देश्यीय संस्थाचे अध्यक्ष राज मोहम्मद खान शिकलगर व सहकारी यांनी शाळेस भेट दिली व निकष पडताळणी करून त्याबद्दल प्रमाणपत्र शाळेला प्राप्त झाले असून सदर कार्याबद्दल संस्थाध्यक्ष डॉ सुरेश बोरोले , संचालक पंकज बोरोले, उपाध्यक्ष अविनाश राणे, भागवत भारंबे, नारायण बोरोले,गोकुळ भोळे व संचालक मंडळाने अभिनंदन केले आहे .
या व्यसनमुक्तीच्या महत्वाच्या कार्यात चोपडा गटशिक्षणाधिकारी डॉ.भावना भोसले. केंद्रप्रमुख दिपक पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली मुख्याध्यापक एम.व्ही.पाटील व सहकारी शिक्षक चंद्रकांत जाधव, अनिल पाटील, चंद्रशेखर चौधरी, दिलीप जैस्वाल, गायत्री शिंदे, आर.डी.पाटील,योगेश चौधरी, मनोज अहिरे, प्रफुल्ल महाजन, स्वप्नील ठाकूर, प्रशांत पाटील,मयूर पाटील ,जयश्री पाटील ,धनश्री जावळे, महेश गुजर,सचिन लोखंडे,सचिन पवार, नितीन वाल्हे,स्वाती पाटील ,गोपाल पाटील यांसह कर्मचारी शेख सईद ,शेखर पाटील ,दिलीप बाविस्कर, रविंद्र शार्दूल, कैलास बोरसे, संदीप पाटील, प्रमोद पाटील,यांनी निकष पूर्ततेसाठी प्रयत्न केले .