अमळनेर – आस्थापनांनी ठरवून दिलेल्या वेळेपेक्षा जास्त वेळ हॉटेल चालवल्याने डीवायएसपीनी स्वतः पथकासह छापा टाकून चार हॉटेलमालकांवर गुन्हे दाखल केले आहेत.
नव्याने रुजू झालेले डीवाय. एस. पी.राकेश जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक अंबादास मोरे, पोलीस नाईक सुनील हटकर, पोलीस नाईक शरद पाटील, पोलीस कॉन्स्टेबल रवींद्र पाटील, दीपक माळी, हेडकॉन्स्टेबल कैलास शिंदे, पोलीस प्रमोद पाटील यांनी शहरात विविध ठिकाणी गस्त घालून छापा टाकला. यावेळी काही दुकाने व हॉटेल्स प्रशासनने ठरवून दिलेल्या वेळेपेक्षा अधिक वेळ सुरू होती. म्हणून हॉटेल निसर्गचे मालक दिनेश गोपाळ चौधरी, हॉटेल कृष्णाईचे मालक सचिन गुणवंत पाटील, हॉटेल साईचे मालक भूषण मोहन पाटील, तर भैया मटण हॉटेलचे मालक पंकज साळी यांच्यावर भा.दं. वि. कलम १८८, २६९, ३३ (डब्ल्यू)/ १३१ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.