यावल – तालुक्यातील सांगवी गावाजवळ फैजपुर यावल मार्गावर एका चारचाकी वाहनातुन पोलीसांनी विनापरवाना कत्तलीसाठी १o जनावरे वाहतुक करतांना पकडले असून पोलिसांनी याबाबत कारवाई करीत चारचाकी मोटर वाहन चालका विरुद्ध गुन्हा दाखल केला आहे .
या विषयी पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार फैजपुर यावल राज्य मार्गावर सांगवी गावाच्या बस स्टॅन्ड जवळ सार्वजनिक ठिकाणी सोमवार दि. २६ ऑक्टोबर रोजी सकाळी ११ .४५ वाजेच्या सुमारास टाटा कंपनीच्या ४०७या एमएच ०६ एजी ७६८९या चारचाकी वाहनातुन आरोपी राजु नरसिंग बारेला (रा. .आदर्श नगर , चोपडा) क्लीनर समीर शाह दिलावर शाह (रा . शेखपुरा साने गुरुजी वसाहत चोपडा) आणि तोहीद शेख (रा . चोपडा) हे त्यांच्या ताब्यातील वाहनातुन विनापरवाना सुमारे २ लाख ४० हजार रुपये किमतीचे १० गोवंश जातीचे जनावरे कत्तलीच्या इराद्याने वाहतुक करतांना सुमारे तिन लाख रुपये किमतीच्या टाटा ४०७ वाहनात पोलीसांना मिळुन आलेत. याविरोधात यावल पोलीस स्टेशनमध्ये पोलीस कर्मचारी सुशिल रामदास घुगे यांनी फिर्याद दिल्याने भाग ५ भादवी ४२९ महाराष्ट्र प्राणी संरक्षण अधिनियम१९७६चे कलम ५ ए ६ .९ महाराष्ट्र पशुक्रुरता अधिनियम ११ ( १ )प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आले आहेत.
दरम्यान वाहतुकीत पकडण्यात आलेले सर्व गोवंश जातीचे जनावरे मनवेल तालुका यावल गोरक्षक शाळेत पाठवण्यात आले आहेत. सदर गुन्ह्याचा तपास पोलीस निरिक्षक अरूण धनवडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरिक्षक जितेन्द्र खैरनार, पोलीस कर्मचारी अशोक जवरे हे तपास करीत आहे.