भुसावळ – ( प्राची पाठक) महावितरण ने राज्यातील ७६ लाख वीज ग्राहकंना कनेक्शन तोडण्याची नोटीस बजावण्यात आली असून ४ कोटी जनतेला अंधारात टाकण्याचे पाप करणार्या महावितरण कंपनीच्या निषेधार्थ शहर भाजपा व इतर शाखांच्यावतीने विज वितरण कंपनीच्या कार्यकारी अभियंत्यांना निवेदन सादर करुन विज बिल सरसकट माफ करण्याची मागणी करण्यात आली आहे.
याबाबत निवेदनात, कोरोनाच्या काळात संपूर्ण राज्याचे आर्थिक चक्रे मंदावली होती, त्यामुळे प्रत्येकाचे आर्थिक गणित चुकत गेले. या काळात शासनामार्फत नागरिकांना दिलासा देण्यासंबंधी जनहितार्थ काही घोषणा होण्याची गरज होती मात्र तसे न होता वीज कपनीद्वरे जनतेला वाढीव वीज बिले देत नागरिकांची थट्टा चालविली असल्याचे निवेदनात म्हटले आहे.
– विज कंपनीने विज बिलाची दरवाढ रद्द करावी, सक्तीची वीज बिल वसुली थांबवावी, चुकीचे वीज बिले लवकरात लवकर दुरुस्त करण्यात यावी, कोरोना काळातील वीज बिले सरसकट माफ कराणे, शेती पंपांसाठी २४ तास वीज सेवा द्यावी. या मागण्यांवर सहानुभुतीपूर्वक विचार करुन त्रस्त झालेल्या नागरिकांना न्याय मिळवून देण्याची मागणी निवेदनातून करण्यात आली आहे.
विज कंपनीच्या कार्यकारी अभियंत्यांना शहराध्यक्ष परिक्षीत बर्हाटे यांच्या नेतृत्वात सादर करण्यात आलेल्या निवेदनावर सरचिटणीस दिलीप कोळी, सरचिटीस पवन बुंदेले, सामाजिक कार्यकर्ते प्रमोद सावकारे, खुशाल जोशी, राजु खरारे, अर्जुण खरारे, अथर्व पांडे, संजय बोचरे, संदीप सुरवाडे, बिसन गोहर, लक्ष्मण सोयंके, शिशिर जावळे, अजय नागराणी, चेतन बोरोले, सागर जाधव, प्रशांत भट, नंदकिशोर बडगुजर, प्रसन्ना पांडे, विशाल जंगले, सतीष सपकाळे, अजय भोळे, रमाशंकर दुबे, दिनेश दोदानी, नायण रणधीर, नगरसेवक प्रा. दिनेश राठी, युवराज लोणारी, सचिन नवगाळे, सुनील अग्रवाल, नितीन वाघोदे, नगरसेवक राजेंद्र नाटकर, राहुल तायडे यांच्या स्वाक्षरी आहेत.


