भुसावळ (प्राची पथक)- येथील राम मंदिर वार्ड भागातील मनोज रामस्वरूप (दरगड ) माहेश्वरी यांची सुकन्या कु. सेजल मनोज माहेश्वरी (दरगड) या मुलीने सी. एस. फाउंडेशन परीक्षेत भारतातून 25 व्या क्रमाकाने उत्तीर्ण होवून विशेष प्राविण्य मिळविल्याबद्दल येथील श्री राधाकृष्ण प्रभात फेरी तर्फे तिचा सत्कार करण्यात आला .
या प्रसंगी प्रभात फेरीचे अध्यक्ष राधेश्याम लाहोटी व सदस्यांनी देवीची चांदीची मूर्ती व पुष्पगुच्छ देवून सेजल याचा सत्कार केला. यावेळी पं. जगदीश शर्मा , आरोग्य सभापती प्रा दिनेश राठी, संजीवनी लाहोटी , संतोष काबरा , सामाजिक कार्यकर्ते जे. बी. कोटेचा , संजय अग्रवाल, दिलीप टाक, पिंटू हेड़ा , श्यामभाऊ अग्रवाल, जी.आर ठाकुर, श्यामसुंदर काबरा , प्रेम लड्ढा, लिलाधर अग्रवाल , श्रीकांत लाहोटी , अनूप अग्रवाल , विजय काबरा , विनोद शर्मा , प्रशांत शर्मा , सतिष शर्मा, व राधाकृष्ण प्रभात फेरीचे सदस्य यावेळी उपस्थित होते.