डोंगर कठोरा, ता.यावल, (रविंद्र आढाळे) :- येथील ग्रामपंचायतीच्या अटीतटीच्या लढतीत सरपंचपदी नवाज बिसमिल्ला तडवी तर उपसरपंचपदी धनराज देविदास पाटील यांची निवड झाली आहे.
सरपंच पदासाठी नवाज तडवी व जुम्मा तडवी या दोघांनी फॉर्म भरलेले होते त्यामध्ये जुम्मा तडवी यांना ६ तर नवाज तडवी यांना ७ मते पडुन विजयी झाले.तसेच उपसरपंच पदासाठी धनराज पाटील यांचा एकच फॉर्म असल्यामुळे त्यांची बिनविरोध निवड झाली.अध्यासी अधिकारी म्हणुन प्रफुल्ल कांबळे यांनी काम पाहिले.
यावेळी ग्रा. पं. सदस्य डॉ. राजेंद्रकुमार झांबरे, मनोहर महाजन, जुम्मा तडवी,दिलिप तायडे, आशा आढाळे, सकीला तडवी, शबनम तडवी, कल्पना पाटील,हेमलता जावळे,कल्पना राणे,ऐश्वर्या कोलते,ग्रा.वि.अधिकारी सी.जी.पवार,तलाठी वसीम तडवी उपस्थित होते.


