जळगाव – धनाजी नाना चौधरी विद्याप्रबोधिनी संचलित शिरीष मधुकरराव चौधरी महाविद्यालय जळगाव येथे विद्यार्थी विकास विभागाअंतर्गत युवती सभेचे उद्घाटन ऑनलाइन पद्धतीने करण्यात आले.
यावेळी उद्घाटक म्हणून प्राध्यापक डॉ. माधुरी पाटील उपप्राचार्य नुतनमराठा महाविद्यालय यांची उपस्तीथी होती. कार्यक्रमाचे अध्यक्ष स्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ .आर.बी वाघुळदे , विद्यार्थी विकास अधिकारी प्रा. प्रियांका ब-हाटे , युवती सभा प्रमुख प्राध्यापिका देवयानी पाटील यांची उपस्तीथी होती.
ऑनलाइन व्याख्यानमालेत ‘पॉलिसिस्टीक ओव्हरियन डिसिज’ ही समस्या प्रामुख्याने आज मोठ्या प्रमाणात मुलींमध्ये निर्माण होत आहे. ताणतणाव ,अयोग्य आहार, व्यायामाचा अभाव गोष्टींमुळे निर्माण होणाऱ्या समस्येवर योगासने हा प्रभावी उपाय आहे. योगसाधनेच्या माध्यमातून आपण सहज पद्धतीने या समस्येवर मात करू शकतो व आपले मन आणि शरीर दोन्ही सुदृढ बनवू शकतो असे मनोगतातून डॉ.माधुरी पाटील यांनी विद्यार्थिनींना व्यक्त केले.तसेच पीपीटीच्या माध्यमातून विद्यार्थिनींना योगासनांची प्रात्यक्षिके दाखविण्यात आली.
महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.आर.बी.वाघुळदे यांनी -“लॉकडाउननंतरच्या काळात आपणास अनेक समस्या भेडसावत आहे तसेच आरोग्याच्या अनेक तक्रारी पुढे येत आहे. योग्य मेडिसिन बरोबर योगविद्या हा या वरील प्रभावी उपाय आहे. त्यामुळे विद्यार्थिनींनी आपल्या आरोग्याची काळजी जबाबदारीने घ्यावी.
या कार्यक्रमाचे प्रास्ताविक विद्यार्थी विकास अधिकारी प्राध्यापिका प्रियांका ब- हाटे यांनी केले. तर सूत्रसंचालन युवती सभा प्रमुख प्राध्यापिका देवयानी पाटील यांनी केले. या प्रसंगी उपप्राचार्य रेखा भोळे, प्रा.करिष्मा काळे, वाणिज्य विभाग प्रमुख तृप्ती काळे,प्रा कुमुदिनी पाटील यांची उपस्थिती होती.