Monday, February 16, 2026
Divya Jalgaon
Advertisement
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय
No Result
View All Result
Divya Jalgaon
No Result
View All Result

साहित्या नगरातील पाईपलाईन जोडणीचे त्वरित काम होणार 

महापौरांनी केल्या सूचना : सुप्रीम कॉलनीत रविवारी घेणार अमृतची चाचणी

by Divya Jalgaon Team
February 12, 2021
in प्रशासन, राजकीय, सामाजिक
0
साहित्या नगरातील पाईपलाईन जोडणीचे त्वरित काम होणार 

nagarpalika

जळगाव – शहरातील सुप्रीम कॉलनीवासियांना अमृत योजनेंतर्गत सुरळीत पाणी पुरवठा करण्याचा मार्ग मोकळा झाला असून दोन दिवस सुरू असलेले मुख्य जलवाहिनी जोडणीचे काम पहाटे ६ वाजता संपले. महापौर भारती सोनवणे यांनी दुपारी कामाची पाहणी केली. दरम्यान, साहित्या नगरात अमृतची पाईपलाईन टाकण्यात आली नसल्याची तक्रार नागरिकांनी केली असता तात्काळ काम हाती घेण्याच्या सूचना महापौरांनी केल्या.

सुप्रीम कॉलनीतील पाईपलाईन जोडणी आणि भूमीगत पाणी साठवण टाकीची पाहणी करताना महापौर सौ.भारती सोनवणे यांच्यासह स्थायी समिती सभापती राजेंद्र पाटील, नगरसेवक कैलास सोनवणे, गणेश सोनवणे, प्रवीण कोल्हे, प्रभाग समिती सदस्य विठ्ठल पाटील, चंद्रकांत भापसे, मनपा अभियंता योगेश बोरोले, मक्तेदार प्रतिनिधी पंकज बऱ्हाटे आदी उपस्थित होते.

वाघूरच्या मुख्य जलवाहिनीला सुप्रीम कॉलनीतील अमृत योजनेची जलवाहिनी जोडण्याचे काम गुरुवारी सकाळी हाती घेण्यात आले होते. शुक्रवारी पहाटे ६ वाजता काम पूर्ण झाल्यानंतर जळगाव शहराचा पाणीपुरवठा सुरू करण्यात आला. महापौर सौ.भारती सोनवणे यांनी कामाची पाहणी केली. अमृत योजनेंतर्गत सुप्रीम कॉलनीत १५ लक्ष लिटरची भूमीगत पाणी साठवण टाकी तयार करण्यात आली असून त्याठिकाणी उच्च क्षमतेचे २ पंप बसविण्यात आले आहेत. जळगाव शहराचा पाणीपुरवठा दोन दिवस चालणार असून उद्या दुपारी सुप्रीम कॉलनीची टाकी भरण्याचे काम हाती घेण्यात येणार आहे. टाकी पूर्ण क्षमतेने भरल्यानंतर उद्या किंवा परवा चाचणी घेतली जाणार आहे.

साहित्या नगरातील नागरिकांचा प्रश्न सुटणार
सुप्रीम कॉलनीतील नितीन साहित्या नगरात अद्याप अमृत योजनेची पाईपलाईन टाकण्यात आलेली नसून नागरिकांना १० ते १५ दिवसांनी पाणी पुरवठा होतो. महापौर सौ.भारती सोनवणे यांच्याकडे नागरिकांनी याबाबत तक्रार केली असता त्यांनी लागलीच मनपा अभियंता आणि मक्तेदार प्रतिनिधीकडून माहिती घेतली. नागरिकांना लवकरात लवकर सुरळीत पाणीपुरवठा होण्यासाठी अमृतची पाईपलाईन टाकण्याचे काम दोन दिवसात हाती घेत १ महिन्यात पूर्ण करण्याच्या सूचना महापौरांनी दिल्या.

Share post
Tags: Jalgaonmaha palikaMarathi NewsPipelineअमृत योजनेची जलवाहिनी जोडण्याचे कामजलवाहिनी जोडणीचे काममहापौर भारती सोनवणे
Previous Post

विकासात्मक कामांसाठी शासन नेहमीच पाठीशी – जलसंपदा मंत्री जयंत पाटील

Next Post

‘शावैम’ मध्ये दिवसभरात ९१ जणांनी घेतली लस

Next Post
शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, रुग्णालयात दिवसभर २९४ दिव्यांगांची तपासणी

'शावैम' मध्ये दिवसभरात ९१ जणांनी घेतली लस

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

© 2020 Website managed by Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय

© 2020 Website managed by Tech Drift Solutions.

Don`t copy text!
Join WhatsApp Group