मुंबई, वृत्तसंस्था : टेलीकॉम क्षेत्रामध्ये भारत संचार निगम लिमिटेड हि एक भारतीय राज्य मालकीची दूरसंचार कंपनी आहे, बीएसएनएलचे मुख्यालय नवी दिल्ली, येथे आहे. १ ऑक्टोबर २००० रोजी हे भारत सरकारचे दूरसंचार विभाग, संचार मंत्रालय यांनी एकत्रित केले. हे देशभरातील दूरसंचार नेटवर्कद्वारे मोबाईल व्हॉईस आणि इंटरनेट सेवा प्रदान करते. ही भारतातील सर्वात मोठी वायरलाइन टेलिकम्युनिकेशन नेटवर्क कंपनी आहे जी 60% पेक्षा जास्त मार्केट शेअर आणि चौथी मोठी वायरलेस टेलिकम्युनिकेशन ऑपरेटर आहे.
या कंपनीने नुकतेच आपल्या ग्राहकांसाठी 199 रुपयांच्या पोस्टपेड प्लान वाऊचरमध्ये सुधारणा केली आहे. हा प्लान जिओ शी स्पर्धा निर्माण करणार आहे. कारण यामध्ये कोणत्याही नेटवर्कसाठी अनलिमिटेड कॉलिंग या प्लानमध्ये युजर्सला 25 जीबी डेटा मिळतो. यासोबतच कंपनी डेटा रोलओवरचा सुविधा देते. यामुळे युजर्स 75 जीबीपर्यंत डेटा रोलओवर करु शकतात. बीएसएनएलने 199 रुपयाच्या प्लानमध्ये केलेले हे नवे बदल 1 फेब्रुवारीपासून लागू झाले आहेत.
याआधी डिसेंबरमध्येही बीएसएनएलने 199 रुपयाच्या प्लानमध्ये सुधारणा केली होती. आधी या प्लानमध्ये केवळ 300 मिनिटे व्हाईस कॉलची सुविधा होती. नंतर कंपनीने ही कॉल मर्यादा अनलिमिटेड केली. पोस्टपेड प्लान व्यतिरिक्त याच रेंजमध्ये कंपनी प्रीपेड प्लानही देत आहे. या 199 रुपयांच्या प्रीपेड प्लानमध्ये तुम्हाला दर दिवशी 2 जीबी हाय स्पीड डेटा, कोणत्याही नेटवर्कवर अनलिमिटेड व्हॉईस कॉलिंग आणि 100 एसएमएस मिळतील. या प्लानची 30 दिवसाची व्हॅलिडीटी असेल. या प्लानद्वारे युजर्सला एकूण 60 जीबी डेटा देण्यात येत आहे. रिचार्ज आणि व्हॅलिडीटीमध्ये बीएसएनएलचे रिचार्ज प्लान जिओ आणि एअरटेलपेक्षा अधिक चांगले आहे. बीएसएनएलचा हा प्लान रिलायन्स जिओ आणि वोडाफोन-आयडियाला टक्कर देत आहे. दोन्ही कंपन्यांनी याआधीच आपल्या ग्राहकांसाठी 199 रुपयाचा प्रीपेड प्लान आणला आहे.