अमरावती, वृत्तसंस्था | सध्या राज्यात महिला बलात्काराच्या घटनांमध्ये वाढ झालेली दिसत आहे. अमरावती जिल्ह्यातील आदिवासी भागात असाच एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. महिलेला दारु पाजून तिच्यावर सामूहिक बलात्कार केल्याची घटना घडली आहे. या घटनेमुळं परिसरात एकच खळबळ उडाली आहे.
5 फेब्रुवारी रोजी अमरावती जिल्ह्यातील शिरखेड पोलिस ठाण्याअंतर्गत तळेगाव येथे एका आदिवासी महिलेला चार दिवस दारु पाजण्यात आली, त्यानंतर तिच्यावर सामूहिक बलात्कार करण्यात आला. धक्कादायक बाब म्हणजे या प्रकारादरम्यान महिलेचा मृत्यू झाला आहे. या प्रकरणासंदर्भात घटनास्थळावरुन पोलिसांनी विष्णोरा येथील रहिवासी निलेश मेश्रामला अटक केली आहे.
1 फेब्रुवारीपासून मृत महिलेला रिद्धपूर निवासी एका प्रतिष्ठित सरकारी कॉन्ट्रॅक्टरच्या विट भट्टीवरुन उचलण्यात आलं होतं. बलात्कार करणाऱ्यांमध्ये सुधीर रघुपती वानखेडे आणि विनोद तुकाराम वानखेडे यांचा समावेश असून पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतलं आहे. पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या आरोपीवर कलम 302, 376 आणि कलम 201 नूसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दरम्यान, क्राईम ब्रांचच्या जबाबात आरोपी मेश्रामने तोंड उघडल्यास त्याचीही हत्या करु, अशी धमकी आरोपी सुधीर रघुपती वानखेडे आणि विनोद तुकाराम वानखेडे यांनी त्याला दिली असल्याचं मेश्रामने पोलिसांनी सांगितलं आहे.